dc vs kxip ipl 2020: सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय dc vs kxip ipl 2020: Delhi win in Super Over

             IPL-2020

              रोजनिशी

       ✍️नीलिमा शिंगणे-जगड



dc vs kxip ipl 2020: सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय

Super Sunday. Super Over. Super Finish.


One game, that’s what all it took for the first Super Over-finish in the Dream11 Indian Premier League (IPL) 2020 and it was Delhi Capitals, who came out on top, beating Kings XI Punjab at the Dubai International Cricket Stadium on Sunday.



क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ असे म्हंटल्या जाते, हे दिल्ली आणि पंजाब संघातील सामन्यात परत एकदा पाहायला मिळाले.सुपर संडे...सुपर ओव्हर...आणि सामन्याचा सुपर फिनिश...सर्व काही रोमहर्षक असे होते. 


सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीने पंजाबवर विजय मिळवला. सुपर ओव्हर सुपर संडे आणि कागिसो रबाडाची सुपर गोलंदाजी. पंजाब विरुद्ध दिल्ली संघातील सामना रोमहर्षक झाला.


राबडाने ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवत फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये सहज विजय मिळविता आला. दोन्ही संघांनी २० षटकांमध्ये १५७ अशा समान धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.  रबाडाने या संधीचा फायदा घेत सुपर गोलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.


पंजाबकडून मयांक अग्रवालने ८९ धावांची फटकेबाजी केली. पण त्याला संघाला विजया पर्यंत नेता आले नाही. यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. 


स्टॉइनिसने धावांचा पाऊस पाडत २० चेंडूंत अर्धशतक  केले. यामुळेच दिल्ली संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. स्टॉइनिसने २१ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांची प्रेक्षणीय फलंदाजी करून ५३ धावा उभारल्या. स्टॉइनिसच्या या दमदार फलंदाजीमुळे संघाची धावसंख्या १५७ झाली.


या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी सुंदर खेळप्रदर्शन केले. दिल्ली संघाकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भेदक मारा केला. आर. अश्विनने या सामन्यात एकच षटक टाकुन दोन गडी बाद केले.  या षटकानंतर  त्याला दुखापत झाल्याने अश्विन नंतर खेळू शकला नाही. दिल्ली संघाचा फिरकीपटू अक्षर पटेलने अचूक मारा करित चार षटकांमध्ये फक्त १४ धावा देत एक गडी बाद केला.


 गोलंदाजांचा दिवस


पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने  सुरवातीलाच दिल्लीला तीन धक्के दिले. शमीच्या गोलंदाजीवर शिखर धवन शून्यावर मैदानाबाहेर गेला. त्यानंतर शमीने पृथ्वी शॉ आणि शेमरॉन हेटमायरला तंबूत पाठविले. शमीने भेदक गोलंदाजी करून  दिल्लीची अवस्था ३ बाद १३ अशी केली.


डाव सावरला


यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी ७३ धावांची भागीदारी रचली. मात्र,नंतर दोघेही फक्त एका धावेच्या अंतराने बाद झाले.यामुळे दिल्ली संघाला फार मोठा धक्का बसला. शमीने पुन्हा भेदक गोलंदाजी करत श्रेयस अय्यरला बाद केले. श्रेयसने यावेळी ३९ आणि पंतने ३१ धावा केल्या होत्या. हे दोघे बाद झाल्यावर मार्कस स्टॉइनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. स्टॉइनिसच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीला दिडशेपेक्षा अधिक धावासंख्या उभारता आल्या.



Brief Scores: Delhi Capitals 157/8 (Marcus Stoinis 53, Shreyas Iyer 39; Mohammad Shami 3/15) tied Kings XI Punjab 157/8 (Mayank Agarwal 89, KL Rahul 21; Kagiso Rabada 2/28)


 In Super Over:

Delhi Capitals 3/0 beat Kings XI Punjab 2/2




टिप्पण्या