Covid19:कोविड रुग्ण देवराव वाघमारे बेपत्ता प्रकरणी चौकशी समिती लागली कामाला

"माझा भाऊ जिवंत परत द्या किंवा मृत  दाखवा",बेपत्ता रुग्णाच्या भावाचा टाहो

कोविड रुग्ण देवराव वाघमारे बेपत्ता प्रकरणी चौकशी समिती लागली कामाला 



अखेर प्रशासनाने घेतली दाखल 


अकोला: शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यातील  विसवी तालुका मेहकर येथील रुग्ण कोविड -19 च्या उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती  झाले होते. देवराव वाघमारे असे या बेपत्ता झालेले कोरोनाग्रस्त रुग्णाचे नाव आहे. उपचार दरम्यान वाघमारे हे रुग्णालयातुन अचानक गायब झाले. या प्रकाराने व्यथित  झालेल्या वाघमारेच्या भावाने "माझा भाऊ जिवंत परत द्या किंवा मृत  दाखवा",अशी मागणी  जिल्हाधिकारी यांना केली होती.  मात्र,प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य ओळखले नाही. या प्रकरणी प्रशासनाने वेळीच योग्य दाखल घेतली नसल्याने वाघमारे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या  मागणीला  वंचित बहुजन  आघाडीने पाठींबा दिला. 

वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासन खडबडून  जागे झाले. या प्रकरणाची दखल घेत अखेर जिल्हाधिकारी यांनी सर्वोपचार रुग्णालयातून गायब देवराव वाघमारे आणि अविनाश यांना  शोधण्यासाठी  सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ  मीनाक्षी गजभिये यांचे अध्यक्षतेखाली  चौकशी समिती गठीत केली असून, समिती शोध घेत असल्याचे  माहितीचे पत्र आंदोलक महेंद्र डोंगरे  यांना आज प्राप्त झाले आहे.



अकोला सर्वोपचार रुग्णालयात कारभार सांभाळणारे सर्वसामान्य जनतेला समाधानकारक उत्तर देत नाही.त्यामुळे  जनता नेहमीच या प्रशासनावर नाराज आहे. त्यातच कोरोना विषाणू मुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नवनविन  किस्से ऐकायला मिळत आहेत.या सर्वांवर कळस म्हणून चक्क येथे उपचारासाठी  दाखल रुग्णच  गायब झाला असल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे "माझा भाऊ मला जिवंत परत द्या किंवा मृत झाला असेल तर त्याचा मृतदेह दाखवा", असा टाहो फोडत गजानन वाघमारे यांनी  जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन मागणी केली होती. 



अशी घडली घटना
गजानन हरी वाघमारे रा विसवी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांचे भाऊ देवराव हरी वाघमारे  यांना 21 ऑगस्ट रोजी सर्वोपचार रुग्णालयात  पेशी कमी झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना 23 ऑगस्ट रोजी कोविड चाचणी घेण्यासाठी सर्वोपचारच्या  वॉर्ड नं 24  मध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना वॉर्ड नं 10 - 11 मध्ये हलविण्यात आले.  तेथूनही त्यांना वॉर्ड नं 6 मध्ये हलविले. या  काळात रुग्णांच्या नातेवाईक यांना रुग्णाला भेटायला मनाई करण्यात आली. त्यामुळे कुणीही नातेवाईक त्यांना न भेटता आपला रुग्ण कुठे व कसा आहे?  याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तो रुग्णच गायब असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने सांगितली.  



सर्वोपचार रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल असलेला रुग्ण पळून जाऊ शकत नाही, असे ठाम मत  गजानन वाघमारे  यांनी व्यक्त करून त्याबाबत योग्य चौकशी  करावी, या मागणीसाठी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  त्यानंतरही न्याय मिळत नसल्याने अखेर    27 ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला व जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले होते.  



या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल रुग्ण चक्क  गायब होणे हा प्रकार म्हणजे भोंगळ  कारभाराचा कळस असून, असा गंभीर प्रकार  सहन केला जाणार नाही त्यासाठी रुग्णाच्या भावाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी  असून वेळ पडली तर आंदोलन करू अशी भूमिका घेतली होती.  



या भूमिकेवर जिल्हाधिकारी पापळकर यांनी महेंद्र डोंगरे यांना लेखी पत्र देऊन सांगितले की,याकामी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांचे अध्यक्षतेखाली  काम करीत असल्याचे सूचित केले आहे.
अशी समिती गठीत करणे म्हणजेच  बेपत्ता रुग्णाच्या कुटुंबिया साठी आघाडीला प्राथमिक यश मिळाले.हे प्रकरणाच्या मुळाशी जावून यामागे काय सत्य आहे, याचा छडा लावल्या शिवाय गप्प बसणार नाही,असे महेंद्र डोंगरे यांनी सांगितले

टिप्पण्या