Covid health:अकोल्यात तीन डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर सुरू; दोन शहरात,एक मूर्तिजापूरला

     कोरोना वार्तापत्र:अकोला

अकोल्यात तीन डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर सुरू; दोन शहरात,एक मूर्तिजापूरला

Three Dedicated Covid Health Centers launched in Akola;  Two cities, one to Murtijapur


अकोला,दि.13: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांनी दिले आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रस्तावित केल्यानुसार अवघाते बाल रुग्णालय व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मूर्तिजापूर येथे 20 बेड, युनिक हॉस्पिटल, वाशिम बायपास रोड अकोला येथे 18 बेड आणि अकोला अक्सिडेंट क्लिनिक, लक्ष्मी नगर अकोला येथे 16 बेड  आवश्यक साहित्य, मनुष्यबळ व सर्व सुविधेसह डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याची परवानगी अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात आली आहे.


अटी व शर्ती 


*डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल केन्द्रामध्ये आयसीएमआर व राज्य आरोग्य व कुंटूब कल्याण विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. 

*महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी  निर्गमित होणारे आदेश तसेच मार्गदर्शक सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील,  

*तसेच  नमूद केल्यानुसार  बेड ऑक्सीजनसह उपलब्ध करुन देण्यात यावे, डेडीकेटेड कॉविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना ते घेत असलेल्या सोई सुविधांकरीता शासनाचे धोरण तसेच दरपत्रकानुसार उपचाराकरिता शुल्क आकारण्यात यावे. 

*या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येवू नये. जास्त रक्कमेची आकारणी केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.


*कोविड बाधित उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा तसेच आवश्यकतेप्रमाणे ऑक्सीजन व व्हेन्टीलेटर उपलब्ध ठेवण्यात यावा. 

*आयसीएमआर व राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन दयावे,  

*या सेंटरमध्ये रुग्णांचे उपचारार्थ लागणारा पुरेशा प्रमाणातील तज्ञ डॉक्टर, कर्मचारी व अधिकारी वर्ग 24x7 नियमीतपणे उपस्थित ठेवावा लागेल. 

*सदर कोविड हॉस्पीटलमध्ये संशयित कोविड रुग्णांचे घशाचे किवा नाकाचे नमूने घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, 

*पल्स ऑक्झीमिटर व्हर्चुअल असिस्टंट अँड मॉनीटरिंग, टेलीफोनीक व्हिडीओ कॉल सुविधा पुरविणे आवश्यक राहील, 

*बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापनासाठी महानगर पालिका, अकोला यांनी नियुक्ती केलेल्या एजेन्सी सोबत करारानामा करुन घेण्यात यावा, 

*संबंधीत कोविड केअर सेंटरवर जेवन बाहेरुन बोलविता येणार नाही,  प्रस्तावित करण्यात आलेल्या रुग्णालयाचे आजुबाजूचे रहीवासी यांची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, 

*कोविड केअर सेंटर चालवित असतांना काही कायदेशिर बाबी उद्भवल्यास त्या आपल्या स्तरावरुन सोडविण्यात याव्यात. त्याकरिता शासन जबाबदार राहणार नाही,

* कोविड हॉस्पीटलने दैनदिन रुग्णाचा व संबंधीत माहिती पोर्टलवर कळविणे तसेच जिल्हा प्रशासनास कळविणे व विहित अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे कोविड केअर सेंटरला बंधनकारक राहील, 

*तसेच N-95 मास्क, डिजिटल थर्मामिटर, अत्यावश्यक सेवा ह्या 24x7 पुरविणे आवश्यक राहिल, 

*डेटीकेटेड कॉविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना ते घेत असलेल्या सोई सुविधांकरीता नियमानुसार माफक शुल्क आकारण्यांत यावे, असे या आदेशात नमूद केले आहे.


अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5614


आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 547 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 226  अहवाल निगेटीव्ह तर 226 अहवाल पॉझिटीव्ह आले.


त्याच प्रमाणे काल (दि. 11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच  तर खाजगी लॅब मध्ये आज एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5614 (4514+945+155)  झाली आहे. आज दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 33243 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  32365, फेरतपासणीचे 193 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 683 नमुने होते. आजपर्यंत एकूण 32823 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28309    तर पॉझिटीव्ह अहवाल  5614 (4514+945+155) आहेत.


आज 226 पॉझिटिव्ह


दरम्यान आज दिवसभरात 226 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 155 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 61 महिला व 94 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील त्यातील मुर्तिजापूर येथील 28 जण, चिखली ता. मुर्तिजापूर येथील 10 जण, तेल्हारा व केडिया प्लॉट येथील सात जण, डाबकी रोड, देशमुख फैल व जीएमसी हॉस्टेल येथील सहा जण, उमरी येथील चार जण, महसूल कॉलनी, मलकापूर, अडगाव, गौरक्षण रोड, खडकी, जठारपेठ येथील प्रत्येकी तीन जण, सातव चौक, सदरपूर, गाडेगाव ता. तेल्हारा, कौलखेड, गिता नगर, न्यु तापडीया नगर, अकोट, बापूनगर येथील प्रत्येकी दोन जण.


तर उर्वरित खोलेश्वर, शासकीय वसाहत, न्यु राधाकिसन प्लॉट, दहिहांडा, वाडेगाव, गंगानगर, वरुर जळूका, आपातापा, संताजी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, वडद, नेर ता. तेल्हारा, शिवाजी नगर, राऊतवाडी, शंकरनगर, वडाळी देशमुख, रणपिसे नगर, हिवरखेड, मुंकूद नगर, राऊतवाडी, तोष्णीवाल ले आऊट, झोडगा ता. बाशीटाकळी, जवाहर नगर, कैलास नगर, गणोरी, भगवतवाडी, ज्योती नगर, अग्रवाल एक्सटेंशन, निमवाडी, वृंदावन नगर, बोर्टा, कान्हेरी सरप, धाबा,सिरसो, सत्यविजय अर्पाटमेन्ट, मोखा, राजूरा घाटे, गोरखेडी ता. मुर्तिजापूर, गायत्री नगर, शास्त्री नगर, खदान, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, माळीपूरा, जूने शहर व पवन चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 


तसेच आज सायंकाळी 71 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 23 महिला व 48 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील  मुर्तिजापूर येथील 28 जण, सहकार नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच जण, डाबकी रोड, आदर्श कॉलनी व पोलिस रेल्वे क्वॉटर येथील प्रत्येकी तीन जण, खामखेडा, लहान उमरी व पैलपाडा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जीएमसी क्वॉटर, लोहारी ता. अकोट, मंगरुळ कांबे ता. मुर्तिजापूर, व्हिएचबी कॉलनी, जळगाव जामोद, मलकापूर, आळशी प्लॉट, वाशिम बायपास, जूना बाळापूर नाका, गड्डम प्लॉट, रचना कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, माळीपूरा, खदान, चिखली, पिंगळा ता. मुर्तिजापूर व अकोट रोड येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कृपया नोंद घ्यावी.


चार मयत


दरम्यान आज चार जणांचे मृत्यू झाले. त्यात अंकुर अर्पाटमेंट, सिटी कोतवाली, अकोला येथील 81 वर्षीय पुरुष असून तो दि. 9  सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, देशमुख फैल, रामदास पेठ, अकोला येथील 38 वर्षीय महिला असून ती 9 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर अकोट येथील 61 वर्षीय महिला असून ती 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच आज एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण आळशी प्लॉट येथील महिला असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


109 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 58 जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून 19 जण, कोविड केअर सेंटर, मुर्तिजापूर येथून 21 जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून 11 जणांना असे एकूण 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


1207 रुग्णांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5614 (4514+945+155) आहे. त्यातील 181 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4226 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1207 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 92 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, पातूर, बाळापूर, तेल्हारा, व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आले नाही, तसेच अकोला मनपा व आयएमए अकोला येथे चाचण्या झाल्या नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे 14 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 72  वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे दिवसभरात 92 चाचण्यांमध्ये  सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14725 चाचण्या झाल्या त्यात 959 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.






टिप्पण्या