Covid-19:एकमेकांना दोष देण्याऐवजी कोरोना संकट रोखण्याकडे लक्ष द्यावे-संजय धोत्रे Instead of blaming each other, focus on preventing corona crisis: Sanjay Dhotre

एकमेकांना दोष देण्याऐवजी कोरोना संकट रोखण्याकडे लक्ष द्यावे-संजय धोत्रे


अकोला: covid-19 चा सामना सर्वांनी मिळून व आरोग्य संघटनेच्या सूचनेचे  तंतोतंत पालन करून, प्रत्येकाने जबाबदारी ओळखून स्वतःचा कामकाज आर्थिक घडी नीट बसवून करण्याची गरज आहे,असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी केले आहे.



शासकीय यंत्रणा कमी पडत आहे
अकोला जिल्ह्यासह देशभरात covid-19 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जेव्हा रुग्ण कमी होते, तेव्हा नागरिक दक्षता घेत होते. परंतु, जसजसे व्यवहार सुरू झाले तसे तसे नागरिकांनी बिनधास्तपणे कारभार सुरू करून, दुर्लक्ष केल्यामुळे हे संकट वाढत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत असून, अकोला शहरातील जिल्ह्यातील हॉस्पिटल्स पूर्णपणे भरले असून, रुग्णांना घरात राहण्याची परवानगी शासनाला द्यावी लागत आहे. परंतु, अनेक नागरिकांची घरे लहान असल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे,असे धोत्रे यांनी सांगितले.



"प्रत्येक नागरिकांनी आयुर्वेदिक काढा, होमिओपॅथिक औषधी सोबत बाहेर निघतांना मास्क व शारीरिक दुरी ठेवून कार्य करण्याची गरज आहे. एकमेकाला दोष देण्याऐवजी हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेण्याची सध्याची गरज आहे." 


आरोग्य विभागाच्या सूचनाना हरताळ

ग्रामीण भागांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढत वाढत आहे, हा चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या संदर्भात दक्षता पाळण्याची गरज आहे. शहरांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी बाजारपेठ व दैनंदिन कारभारात सुद्धा आरोग्य विभागाच्या सूचनेचा पालन होत नसल्यामुळे ही रोगराई वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने या संदर्भात आपली जबाबदारी होऊन कार्य करण्याची गरज असल्याचे देखील धोत्रे म्हणाले.



Super speciality हॉस्पिटल त्वरित सुरू करावे

केंद्र सरकारने अकोला हॉस्पिटलला व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. परंतु, डॉक्टर व नर्स यांची कमतरता याबाबत राज्य शासन उदासीन आहे. लोकप्रतिनिधी या संदर्भात पाठपुरावा करत आहे. अकोला सुपर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून  प्रयत्न करीत असताना सुद्धा राज्य शासन याला परवानगी देत नाही. केवळ आश्वासन शिवाय काम होत नाही.  राज्य शासनाने या संदर्भात जिल्ह्यात वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सुपर speciality हॉस्पिटल त्वरित सुरू करावे, बेडची व्यवस्था करावी. अकोला येथे रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे, हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. याबाबत ऑक्सिजन सेंटर उघडण्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु ,त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली नाही,असे धोत्रे म्हणाले. 



गरज असेल तेंव्हाच घराबाहेर पडा

नागरिकांनी आर्थिक परिस्थिती व दैनंदिन कामासोबत घराबाहेर पाडण्याची गरज आहे. त्यामुळे गरज असेल तेव्हाच घराच्या बाहेर  निघावे. बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये ,असे आवाहन देखील धोत्रे यांनी केले.

टिप्पण्या