Corona virus: नो मास्क,नो सर्व्हीस: जिल्हाधिकारी यांची धडक मोहिम २७२ व्यक्तींवर कार्यवाही

मास्क न लावणाऱ्या दुकानदार व बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करुन २७२  व्यक्तीकडून ५४ हजार ४०० रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. 

No Mask, No Service: Collector's crackdown on 272 persons



अकोला: ‘नो मास्क, नो सर्व्हीस’ या मोहिमेची सुरुवात मंगळवार पासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी धडक मोहिम राबवून केली. आज शहरातील प्रमुख बाजारपेठेत स्वत: भेट देवून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्या बाबत मार्गदर्शन करुन आवाहन केले. 


यावेळी त्याच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हे होते.


नो मास्क, नो सर्व्हीस’ या मोहिमेचे शुभारंभ करुन मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे सेवा दिल्या जाणार नाही. ही मोहिम जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर मोठया प्रमाणात राबविली जात आहे. या मोहिमेसोबतच नो मास्क नो मेडीसीन, नो मास्क नो धान्य, नो मास्क नो सेल या प्रकारच्या मोहिम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक स्वरुपात प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.


जिल्ह्यामध्ये कोविड-19 या विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. याला अटकाव घालण्याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजना अंतर्गत आज जिल्हाधिकारी यांनी ‘नो मास्क, नो सेवा’ या मोहिमेची शुभारंभ करुन बाजारपेठेतील दुकाने, हातगाडी व बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना भेट  देवून मास्क लावण्याबाबत आवाहन केले. 


मास्क लावणाऱ्यांना गुलाब पुष्प

न लावणाऱ्यांना दंड

मास्क न लावणाऱ्या दुकानदार व बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करुन २७२  व्यक्तीकडून ५४ हजार ४०० रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. तसेच बाजारपेठीतील धडक मोहिमे दरम्यान मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांना गुलाब भेट देवून दुसऱ्यांना मास्क लावण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. 


अधिकार प्रदान

कोविड-19 च्या उद्रेक कालावधीमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल किवा इतर तत्सम साधनाचा वापर न करण्याऱ्या विरुध्द जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे  विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यासाठी प्राधिकृत केले आहे.


*‘नो मास्क, नो सवारी’ अंतर्गंत एसटी व खाजगी बसने प्रवास  करणारे, प्रवासी व माल वाहतूक करणारे यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस निरिक्षक शहर वाहतूक, विभाग नियंत्रण राज्य परिवहन यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे. 


* ‘नो मास्क, नो पेट्रोल’ सप्लाय अंतर्गंत वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक व वाहने यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 


*‘नो मास्क, नो सर्व्हीसेस’ अंतर्गंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोस्ट ऑफीस, एलआयसी ऑफीस, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी व खाजगी बँक व इतर शासकीय कार्यालय येथे येणाऱ्यावर संबंधित विभागाचे प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.


*‘नो मास्क, नो सर्व्हीस’ अंतर्गंत हॉटेल व स्विटमार्टवर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिका यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 


*‘नो मास्क, नो सर्टिफिकेट’ अंतर्गंत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांच्या कार्यालयाकडे येणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित विभाग व कार्यालय प्रमुखाना देण्यात आले आहे.


*‘नो मास्क, नो एँट्री’ अंतर्गंत दुकानदार व कापड विक्रेते यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका व नगरपरिषद.


*‘नो मास्क, नो बाईक’ अंतर्गंत रस्त्यावर वाहन चालविण्यावर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिका यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 


*‘नो मास्क, नो सेल’ या अंतर्गंत भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, दुग्धविक्रेते व मद्यविक्रेते यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका व राज्य उत्पादन शुल्क यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.


*‘नो मास्क, नो मेडीसीन’ या अंतर्गत औषधीचे दुकानावर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. 


*‘नो मास्क, नो धान्य’ अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.


काय आहे आदेशात

संबंधित विभागाने मार्गदर्शक सूचनेनुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरीता आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे पथके तयार करावे. 


दुकानदार, प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्याकडून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यास नियमानुसार गुन्हे दाखल व दंड वसूली करण्यात यावी. 


चेहऱ्यावर मास्क न लावलेल्या विरुध्द प्रत्येकी दोनशे रुपये दंड तसेच दुकानदार, प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्याविरुध्द दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे.



टिप्पण्या