- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना मृतकांच्या अंतिम यात्रे साठी दोन रुग्णवाहिका सज्ज!
*जोपासला जातोय सर्वधर्म समभाव
अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर अकोला कच्छी मेमन जमातच्या पुढाकाराने अंतिम संस्कार करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण अधिक वाढत असल्याने आता दोन रुग्णवाहिका मोफत सेवेत कार्यरत राहणार आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. तसेच अकोलासह अमरावती, बुलढाणा, व वाशिम जिल्ह्यातील रुग्णसुद्धा भरती होत आहेत. त्यानुषंगाने मृत पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर प्रत्येक धर्मियांच्या पद्धतीनुसार अंतिम संस्कार करण्याकरिता अकोला कच्छी मेमन जमातच्या वतीने दोन पथक बनवून दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अकोला कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद जकरिया, कुरैशी बिरादरीचे साबिर कुरेशी, अमन सोसायटीचे तनवीर खान, जन सत्याग्रह संघटनाचे आसिफ अहमद खान, बैदपुरा निवासी जावेद खान शाहबाज खान, वसीम खान, समीर खान, एजाज अहमद खान आदी चोवीस तास सेवा देत आहेत.
या उपक्रमाकरिता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, आरोग्य अधिकारी प्रशांत राजूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सीएस डॉ. राजकुमार चव्हाण, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ. कुसमाकर घोरपडे, डॉ. श्याम सिरसाम, डॉ. दिनेश नेताम, पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे.पहिले पण ही सेवा मोफत होती, अशी माहिती जावेद ज़कारिया यांनी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा