Corona virus:कोरोना काळात रुग्णालयात पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवा... Reserved beds for journalists in the hospital during Corona ...

कोरोना काळात रुग्णालयात पत्रकारांसाठी  बेड राखीव ठेवा...   

Reserved beds for journalists in the hospital during Corona ...

अकोला जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन   



अकोला: राज्यावर कोरोनाचे संकट अधिक तीव्र होत असताना देखील पत्रकारांचे कर्तव्य अहोरात्र सुरू आहे. अशा स्थितीत पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवणे गरजेचे आहे. या मागणीसाठी सोमवारी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने निवेदन देण्यात आले.   



पुणे येथे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे  कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला.त्यांना हॉस्पिटल मध्ये वेळीच बेड आणि उपचार मिळाले असते तर होतकरू पत्रकाराचा जीव वाचला असता. कोविड १९ बाधित पत्रकारांसाठी हॉस्पिटल मध्ये राखीव बेड ची सुविधा मिळावी.करिता जिल्हाधिकारी अकोला जिल्हा पत्रकार संघाने निवेदन दिले. मागणीचे निवेदन देतांना जिल्हाधिकारी पापळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.                 
                



कोविड-19 ने बाधित होणार्‍या पत्रकारांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्रकारांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रूग्णालायांत पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी, अशा मागणीचे निवेदन राज्यातील सर्व जिल्हा पञकार संघानी द्यावे असे आवाहन मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले होते.
त्यानुसार आज निवेदन देण्यात आले.



निवेदन देतांना मराठी पञकार परिषदेचे  सिध्दार्थ शर्मा, अकोला पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकतअली मिरसाहेब ,सरचिटणीस प्रमोद लाजूरकर,चिटणीस संजय खांडेकर, दीपक देशपांडे, उमेश अलोणे, धनंजय साबळे, जावेद जकरिया, रामविलास शुक्ला,कमल किशोर शर्मा,मनीष खर्चे, सुधाकर देशमुख, मुकुंद देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या