Corona virus:*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात १०३ पॉझिटिव्ह;३ मयत

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात १०३ पॉझिटिव्ह;३ मयत

*आज सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१७६*
*पॉझिटीव्ह-१०३*
*निगेटीव्ह- ७३*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२ महिला व १४ पुरुष  आहे. त्यातील बोरगाव मंजू  व आगर येथील प्रत्येकी चार जण, पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शास्त्री नगर, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी, लहरीया नगर, चोहट्टा बाजार, गौरक्षण रोड, डाबकी रोड, मोठी उमरी, सिव्हील लाईन, गोडबोले प्लॉट व डोंगरगाव ता. अकोला येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात भिडेवाडी बाळापूर रोड, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष असून तो ११ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, जठारपेठ, सिव्हील लाईन अकोला येथील ८० वर्षीय पुरुष असून तो ८ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर सोनारी ता. मुर्तिजापूर येथील ६४ वर्षीय महिला असून ती १३ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.




दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची कृपया नोंद घ्यावी.



 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७६ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ६६ जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून प्रत्येकी तीन जण, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून एकाचा अशा एकूण १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४६१७+९५१+१५५=५७२३*
*मयत-१८६*
*डिस्चार्ज- ४३७२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ११६५*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या