Corona virus:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज 50 पॉझिटिव्ह;1 मयत

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज 50 पॉझिटिव्ह;1 मयत


*आज  शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२२३*
*पॉझिटीव्ह- ५०*
*निगेटीव्ह-१७३*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ५० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील खोलेश्वर येथील चार जण, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन जण, निमवाडी, रामनगर, रणपिसे नगर, बाळापूर नाका, महान व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शास्त्री नगर, खेतान नगर, जितापूर ता. अकोट, गितानगर, जेतवन नगर, मलकापूर, खेडकर नगर, बलोदे लेआऊट, लहान उमरी, अकोट, करोडी ता. अकोट, गोरक्षण रोड, राऊतवाडी, डोंगरगाव, संतोषनगर, खैर मोहम्मद प्लॉट, खडकी, रेणुकानगर, शास्त्री नगर, गजानन पेठ, डाबकी रोड, पारस, कांचनपूर, वाशिंबा, बार्शिटाकळी, वाडेगाव, उमरी व शिर्ला अंधारे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्री नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरुष असून तो दि. ११ सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. 



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४२५२+९४०+१४७=५३३९*
*मयत-१७६*
*डिस्चार्ज- ४०१७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-११४६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या