Corona virus:अकोला जिल्ह्यात कोरोनाने धरला वेग;पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या झाली 4227

अकोला जिल्ह्यात कोरोनाने धरला वेग;पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  झाली 4227 

अकोला: अकोल्यात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग वाढला असून, गुरुवार,3 सप्टेंबर रोजी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 290 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 214  अहवाल निगेटीव्ह तर 76 अहवाल पॉझिटीव्ह आले.



त्याच प्रमाणे दि. रोजी रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ तर खाजगी लॅब मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4227 (3381+752+94)  झाली आहे. आज दिवसभरात 57 रुग्ण बरे झालेअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसारआजपर्यंत एकूण 28744 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 27996, फेरतपासणीचे 181 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 567 नमुने होते. आजपर्यंत एकूण 28496 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 25115 तर पॉझिटीव्ह अहवाल  4227 (3381+752+94) आहेत.


 76 पॉझिटिव्ह

दरम्यान गुरुवारी दिवसभरात 76 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात  सकाळी 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  26 महिला व 46 पुरुष आहे. त्यात मोहरल बार्शिटाकळी येथील 20 जणबोरगाव मंजू येथील प्रत्येकी पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, अकोली जहागीर व जीएमसी  येथील प्रत्येकी तीन जणकान्हेरीकृषी नगरबाळापूर व बिर्ला कॉलनी  येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित तुकाराम नगरबालाजी नगरशास्त्री नगरमराठा नगरगुडधीशिवसेना नगरअडगावशंकर नगरगौरक्षण रोडजठारपेठसरस्वती भवनआलेगाव ता.पातूर, गीता नगरतेल्हारासुधीर कॉलनीमोमीनपुराझोडगा ता.बार्शीटाकळीजवाहर नगरधामनधरी ता. बार्शीटाकळीदोनद ता. बार्शीटाकळीएसपी ऑफीस जवळमॉउंट कॉरमेल जवळन्यु तापडीयाछोटी उमरी, उमरी, खेळकर नगर, गोरेगाव, एरंडा ता. बार्शीटाकळी व चोहट्टा बाजार  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तसेच सायंकाळी  चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व तीन पुरुष  आहे. अकोट फैल, डाबकी रोड, तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचेही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.



एक मयत

दरम्यान गुरुवारी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पातूर येथील 72 वर्षीय पुरुष असून ते 31 ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.



 57 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 23 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 13 जण, उपजिल्हा रुग्णालयमुर्तिजापूर येथून तीन जणआयकॉन  हॉस्पीटल येथून चार जण,  हॉटेल रणजीत येथून 11 जण तर कोविड कोरोना सेंटरहेडज मुर्तिजापूर येथून तीन जणांना अशा एकूण 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.



697 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4227 (3381+752+94) आहे. त्यातील 160 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3343  संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 724 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 162  चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाअशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.



आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर अकोट येथे 33 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  तर अकोला मनपा येथे 78 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला आयएमए येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चाचण्या झाल्या नाही, तर 44 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 162 चाचण्यांमध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 13438 चाचण्या झाल्या त्यात 782 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.




राज्याची स्थिती


राज्यात ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई: राज्यात आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. आज १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०५  हजार ४२८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.



१०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे, असा दिलासा देतानाच प्रतिकारशक्ती व मनाची इच्छाशक्ती चांगली ठेवावी असा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.


दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी यावेळी संवाद साधला.


आरोग्यमंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, कोविड केअर सेंटर्स आहेत. त्यामध्ये आवश्यक ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, त्यांचा ८० वर्षांचा मुलगा आहे, त्यांचा मुलगा जो साधारण ६०-६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यामुळे कोरोना बरा होतो मात्र योग्यवेळी उपचारासाठी दवाखान्यात जाणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


 

कोरोनाचे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकता
ज्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार आहेत त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असते. अशा कोमॉर्बिड अवस्थेतील रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तो रुग्ण दगावला तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद होते. राज्य शासनाने या संदर्भात पारदर्शकता व प्रामाणिकता याला फार महत्त्व दिले आहे.
दुखणे अंगावर काढू नका विश्लेषण केले तर २४ तासांतले मृत्यू, ४८ तासांतले मृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे एक कारण आहे की लोक दुखणे अंगावर काढतात. लवकर निदान झाले तर त्याचा उपचार तत्काळ करता येतो.



ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करा

प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (SPO2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चितपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.


दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं राहत असतील किंवा एका घरात १०-१५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे  मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेत, घरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो.



३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स

होम आयसोलेशनमध्ये  बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहावे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने  राहणे सुरक्षित आहे. ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोवीड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स आहेत. दोन-अडीच लाखांच्यावर खाटा आहेत., असे श्री. टोपे यांनी सांगितले.



जंबो कोविड सेंटरसाठी क्रेडाईचा सक्रिय पुढाकार
सातारा: जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा प्रशासन येत्या १५ दिवसात एसटी स्टँड लगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात जंबो कोविड सेंटर उभे करत आहे. हा मोठा प्रकल्प असून यासाठी सातारच्या क्रेडाई या बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कामाचा प्रशासनाला यासाठी उपयोग होणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प उभा करत असताना इतर सामाजिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


लोकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज 

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोनामुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका. इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करा तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. चेस द व्‍हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा. कंटेन्मेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या.


आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देऊन कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का. त्यांचे आरोग्य कसे आहे. त्यांना न्युमोनिया सदृश काही लक्षणे आहेत का. घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत. मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का. याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.


कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल, पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावा. शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री अतिशय महत्त्वाची आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सुविधा उभारण्यात मदत केली जाईल. निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा. अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी कोरोनाबाबतचा सविस्तर आढावा दिला. मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विगागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार श्री. मेहता यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके उपस्थित होते.


टिप्पण्या