अकोल्यात कोरोना संक्रमण वाढलं... एकाच दिवशी106 कोरोनाबाधित; 3 मयत
अकोला,दि.4:अकोल्यात कोरोना संक्रमण वाढतच जात असून, आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 527 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 421 अहवाल निगेटीव्ह तर 106 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि. 3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 23 तर खाजगी लॅब मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4356 (3487+775+94) झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 29330 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 28532, फेरतपासणीचे 183 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 615 नमुने होते. आजपर्यंत एकूण 29023 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 25536 तर पॉझिटीव्ह अहवाल 4356 (3487+775+94) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 106 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 106 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 87 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 33 महिला व 54 पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 24 जण, निंबा मुर्तिजापूर येथून 11 जण, मोरवा ता. बाळापूर येथील सात जण, जीएमसी येथील सहा जण, कौलखेड, विद्यानगर गौरक्षणरोड, वाडेगाव येथील प्रत्येकी तीन जण, खडकी, गीता नगर, जठारपेठ, डाबकी रोड, दहिगाव गावंडे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, लोणी, चोहट्टा बाजार, तुकाराम चौक, गायत्री नगर, गंगा नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, मलकापूर, मराठा नगर, कापसी, तापडीया नगर, निंबवाडी, सकनी महान, पातूर नंदापूर, प्रोफेसर कॉलनी, शिवसेना वसाहत, बळवंत कॉलनी व रवि नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नऊ महिला व 10 पुरुष आहे. वाडेगाव येथील 11 जण, बाळापूर येथील चार जण तर उर्वरित नांदुरा ता. तेल्हारा, बटवाडी ता. बाळापूर, कासारखेड ता. बाळापूर व खेडगाव येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचेही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
तीन मयत
दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात मलकापूर येथील 55 वर्षीय महिला असून ती दि. 2 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिरसोली ता. तेल्हारा येथील 65 वर्षीय महिला असून ती दि.19 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला तर मुर्तिजापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून तो दि.29 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
31 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 29 जणांना तर कोविड केअर सेंटर, अकोला येथून दोन जणांना अशा एकूण 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
819 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4356
(3487+775
+94)
आहे. त्यातील 163
जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3374
संख्या आहे. तर सद्यस्थितीत 819
पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 105 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोलाग्रामिण येथे 58 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे 15 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाले नाही, अकोला आयएमए येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 15 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 105 चाचण्यांमध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 13543 चाचण्या झाल्या त्यात 794 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
राज्यात कोरोना
राज्यात आज १३ हजार २८९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के आहे. आज १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा