Corona update: कोरोना अलर्ट*:Akola:आज ८७ पॉझिटिव्ह; ३मयत

*कोरोना अलर्ट*:Akola:आज ८७ पॉझिटिव्ह; ३मयत


*आज शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३७४*
*पॉझिटीव्ह-८७*
*निगेटीव्ह-२८७* 



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३३ महिला व ५४ पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील २४ जण, निंबा मुर्तिजापूर येथून ११ जण, मोरवा ता. बाळापूर येथील सात जण, जीएमसी येथील सहा जण, कौलखेड, विद्यानगर गौरक्षणरोड, वाडेगाव  येथील प्रत्येकी तीन जण, खडकी, गीता नगर, जठारपेठ, डाबकी रोड, दहिगाव गावंडे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, लोणी, चोहट्टा बाजार, तुकाराम चौक, गायत्री नगर, गंगा नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, मलकापूर, मराठा नगर, कापसी, तापडीया नगर, निंबवाडी, सकनी महान, पातूर नंदापूर, प्रोफेसर कॉलनी, शिवसेना वसाहत, बळवंत कॉलनी व रवि नगर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात मलकापूर येथील ५५ वर्षीय महिला असून ती २ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिरसोली ता. तेल्हारा  येथील ६५ वर्षीय महिला असून ती १९ ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला तर मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून तो २९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.



दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३४६८+७७५+९४=४३३७*
*मयत-१६३*
*डिस्चार्ज- ३३४३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-८३१* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या