corona update:*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात ६४ पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*Akola:आज दिवसभरात ६४ पॉझिटिव्ह!


*आज  बुधवार दि. २ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३६९*
*पॉझिटीव्ह-६४*
*निगेटीव्ह- ३०५*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष असून ते बाळापूर  व मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. 

दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

दरम्यान आज तिघांचा मृत्यू झाला. त्यात मूर्तिजापूर येथील २३ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर घेतलेल्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बाळापूर येथील २६ वर्षीय पुरुष पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचाही कोरोणा चाचणी  अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच मुर्तिजापूर येथील ६१ वर्षीय महिला असून तिचा खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून एक जण, आयकॉन  हॉस्पीटल येथून चार जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, हॉटेल रणजीत येथून तीन जण तर कोविड कोरोना सेंटर, हेडज मुर्तिजापूर येथून १३ जणांना अशा एकूण ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३३०५+७४३+९४=४१४२*
*मयत-१५९*
*डिस्चार्ज- ३२८६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६९७* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या