- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Corona treatment:अकोला जिल्ह्यात दोन ऑक्सीजन प्लॉन्टसाठी मंजूरी। Approval for two oxygen plants in Akola district
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला जिल्ह्यात दोन ऑक्सीजन प्लॉन्टसाठी मंजूरी
Approval for two oxygen plants in Akola district
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात शेकडो रुग्णांची भर पडत आहे. ऑक्सीजनची कमतरता हे कोरोना रुग्णामधील एक प्रमूख लक्षण आहे. यासाठी जिल्ह्यातील रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सीजनचा साठा असावा म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गंत दोन ऑक्सीजन प्लॉन्टसाठी मंजूरी दिली आहे.
या ऑक्सीजन प्लॉन्टसाठी 47 लक्ष 99 हजार इतक्या निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यानिधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी एक प्रमाणे दोन ऑक्सीजन प्लॉन्ट उभारण्यात येणार आहे. लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन 10 किलोलीटर अशी ऑक्सीजन टँकची क्षमता राहणार आहे.
यामुळे जिल्ह्यात पुरेसे प्रमाणात ऑक्सीजनचा साठा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील ऑक्सीजनची मागणी पूर्ण होणार असून त्यामुळे ऑक्सीजनी आवश्यकता असणाऱ्या अतिगंभीर स्थितीतील रुग्णांना लाभ होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा