Corona outbreak:कोरोनाचा उद्रेक: आता अकोल्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5796! Now the total number of positive reports in Akola is 5796!

कोरोनाचा उद्रेक: आता अकोल्यात  पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5796!

Corona outbreak: Now the total number of positive reports in Akola is 5796!



मंगळवार: 212 अहवाल प्राप्त; 65 पॉझिटीव्ह, 31 डिस्चार्ज, तीन मयत


अकोला: 15 सप्टेंबर रोजी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 212 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 147 अहवाल निगेटीव्ह तर 65 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच तीन मयत झाले.  


त्याच प्रमाणे 14 सप्टेंबर रोजी रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात  पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5796 (4682+959+155)  झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.




शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 33682 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  32796, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 691 नमुने होते. आजपर्यंत एकूण 33211 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28529  तर पॉझिटीव्ह अहवाल  5796 (4682+959+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


 65 पॉझिटिव्ह


दरम्यान मंगळवारी दिवसभरात 65 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व 40 पुरुष आहे. 


त्यात दापूरा येथील सहा जण, इमरॉल्ड कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येक तीन जण, गोडेबोले प्लॉट, मोठी उमरी, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित सोपीनाथ नगर,अशोक नगर, शास्त्री नगर, लहान उमरी, लंगडगंज, बोरगाव मंजू, संभाजी नगर, मलकापूर, नानकनगर, दहिगाव गावंडे, नागे लेआऊट, आश्रय नगर, कौलखेड, चांदुर, गाडगे नगर, आदर्श कॉलनी, जूना तापडीया नगर, सिव्हील लाईन, जीएमसी, केशव नगर,सागूर अडगाव, कृषी नगर, संभाजी नगर, कार्ला बु. ता. तेल्हारा, तेल्हारा, चोहट्टा बाजार, खिरपूरी ता. बाळापूर, रुस्तमाबाद ता. बार्शिटाकळी व कटयार  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 


तसेच सायंकाळी  16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व 14 पुरुष  आहे. त्यातील अकोट येथील प्रत्येकी चार जण, जठारपेठ येथील दोन जण, तर उर्वरित मुर्तिजापूर, खदान, डाबकी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, मलकापूर, मुर्तिजापूर रोड, चांदूर व गिता नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 


तीन मयत


दरम्यान  तिघांचे मृत्यू झाले. त्यात राजेश्वर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला असून ती 8 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, वाडेगाव ता. बाळापूर येथील 65 वर्षीय महिला असून ती 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर मुर्तिजापूर येथील 62 वर्षीय महिला असून ती 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.


31 जणांना डिस्चार्ज


दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून 12 जण, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथील चार जण, कोविड केअर सेंटर, अकोट येथून 10 जणांना एकाचा अशा एकूण 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


1204 रुग्णांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5796 (4682+959+155) आहे. त्यातील 189 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4403 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1204 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: दिवसभरात 176 चाचण्या, 15 पॉझिटिव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात मंगळवारी दिवसभरात झालेल्या 176 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


दिवसभरात झालेल्या चाचण्या 

अकोला ग्रामिण, पातूर, बाळापूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर अकोट येथे 41 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 44 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, तर अकोला आयएमए येथे 13 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 56 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16 चाचण्या झाल्या त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात  176 चाचण्यांमध्ये  15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 15083  चाचण्या झाल्या त्यात 982 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 



टिप्पण्या