Bachhu Kadu:अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना बाधित Akola Guardian Minister Bachhu Kadu inflicts bitter corona

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना बाधित

Akola Guardian Minister Bachhu Kadu inflicts bitter corona


अकोला:अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार,महिला व बालकल्याण व विमुक्त भटक्या जाती जमाती कल्याण विभागाचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांना कोरोनाने ग्रासले. त्यांनी कोरोना चाचणी केली असता आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


ट्विट करून दिली माहिती

बच्चू कडू यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती स्वतःच आपल्या ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करून दिली.


अपना भिडू बच्चू कडू

बच्चू कडू हे महाराष्ट्रातील राजकारणी असून, ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) निवडून आलेले आहेत.


युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. 


महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू हे शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री पद  भूषवित आहेत.


विदर्भात ते 'बच्चूभाऊ' या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे. 

टिप्पण्या