attack on ex-soldier: माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावरील हल्ल्याचा अकोल्यात निषेध Akola protests attack on ex-soldier Madan Sharma

माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावरील हल्ल्याचा अकोल्यात निषेध

     Akola protests attack on ex-          soldier Madan Sharma


अकोला: IDBI बँक शाखा मुबई येथे नोदल अधिकारी तसेच बँक मॅनेजर पदावर कार्यरत माजी सैनिक मदन शर्मा यांना शुक्रवार,११ सप्टेंबर रोजी त्याच्या कार्यलयात झालेले मारहाणीच्या निषेधार्थ अकोल्यात शनिवारी निषेध सभेचे आयोजन केले होते.



अमर जवान माजी सैनिक संघटना द्वारे माजी सैनिक सुभाष म्हैसने यांच्या वतीने  शनिवार १२ सप्टेंबर रोजी कर्ता हनुमान मंडळ येथे निषेध करण्याकरिता माजी सैनिकांनी एकत्रित येवून शासनाचा निषेध नोंदविला. 



ज्या समाज कटकांनी हे कृत्य केले त्याच्या वर कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या देशात माजी सैनिक ज्याने २४ वर्ष देश सेवा केली. त्याच्या वरच हल्ला होत असेल तर बाकी जनतेचे काय, अश्या आशयाचे निर्देशने देवून घटनेचा निषेध करण्यात आला. 



अकोल्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत निर्देशन देण्यात आली. निषेध सभेला माजी सैनिक सुभाष म्हैसने अध्यक्ष अमर जवान माजीसैनिक संघटना अकोला, माजी सैनिक विलास गासे, लक्ष्मण मोरे, शंकर देशमुख, संतोष चराटे, प्रकाश बाहेकर, रामेश्वर लांडगे, श्रीकृष्ण चक्रनारायण ,वसंत खेडकर, सुरेश वढे, मुरलीधर झटाले,शांताराम काळे, शांताराम रोहणकार ,हिम्मत पोहरे , महादेव खडसाळे, विट्ठल चिकटे, संजय वेध , मुरलीधर आवटे, गजानन माळी, विलास आगरकर, दीपक चतार,विलास धारस्कर , वसंत जायदे, निवृत्ती मानकर व संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या