Akot Wildlife: अकोट वन्यजीव विभागाच्या धाडीत मोठ्या प्रमाणात सागवान जप्त

हिवरखेड येथील  अब्दुल बाकीर अब्दुल बाशीर यांचे राहते घरी धाड टाकली. मात्र, त्याला व त्याचे साथीदारांना वनकर्मचारी यांची चाहुल लागताच वनकर्मचारी पोहचण्यापुर्वी ते फरार होण्यात यशस्वी झाले. 

Large quantity of teak seized in raid by Akot Wildlife Department



अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती अंतर्गत अकोट वन्यजीव विभाग, अकोट मधील हिवरखेड मध्ये अवैध सागवान आणुन साठा केला असल्याबाबत गुप्त माहिती वरुन टाकलेल्या धाडी मध्ये मोठया प्रमाणात सागवान जप्त करण्यात आले.


आज  ३० सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोट वन्यजीव विभाग, अकोट अंतर्गत प्रविण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सोमठाणा प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी वान) आणि  विश्वनाथ चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी नरनाळा (प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक हिवरखेड ) यांनी त्यांचे अधिनिस्त कर्मचारी यांचेसह हिवरखेड येथील  अब्दुल बाकीर अब्दुल बाशीर यांचे राहते घरी धाड टाकली. मात्र, त्याला व त्याचे साथीदारांना वनकर्मचारी यांची चाहुल लागताच वनकर्मचारी पोहचण्यापुर्वी ते फरार होण्यात यशस्वी झाले. 


या ठिकाणाहुन नविन कटाई झालेले सागवान गोल, तसेच कटसाईज कटाई माल, दरवाजा फ्रेम,बेडचे साहित्य, दिवानचे साहित्य आदी माल जप्त करण्यात आले. त्याचबरोबर आरोपीचे घरुन एक रंधा मशीन, तसेच मिस्त्री कामाचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. 


या कार्यवाहीस  उपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेव्याप, अमरावती एम.एस.रेड्डी, तसेच उप वनसंरक्षक अकोट वन्यजीव विभाग, अकोट नवलकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. 


या कार्यवाहीमध्ये वान परिक्षेत्राचे  के. ऐ. चौधरी, आरती कावळे, सरोदा कराड , सविता सावलकर, एस.एस.धोटे, बी.एस.सरकटे,  एस.एस.तायडे, एस.बी.मुंडे, प्रतिभा तुरुक, कुंभारे, आणि आतिफ हुसेन आदी कर्मचारी यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला.



प्रकरणाची धाडीचे कार्यवाहीस पोलीस निरीक्षक  लवंगाळे  व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.


टिप्पण्या