- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरोपी जवळून जुगार साहित्य व नगदी रोख असा एकूण ५,२४० रुपये चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
अकोला: नायगांव परिसरात जुगार (वरली) अड्डयावर मंगळवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली.या कारवाईत आरोपी जाफर हुसेन तहजीब अली पोलिसांच्या हातात लागला असून,रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस अधीक्षक अकोला श्री जी श्रीधर
अपर पोलिस अधीक्षक अकोला प्रशांत वाघुंडे यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सचिन कदम यांचे विशेष पथकाने ही कारवाई केली.
नायगांव परिसरात मोरी जवळ येथे पोलिसांनी वरली-जुगार रेड केली असता , आरोपी जाफर हुसेन तहजीब अली हा पोलिसांच्या हाती लागला. जाफर हा अशोक आंबेडकर नगर, ईरानी झोपड़पट्टी, येथे राहतो.आरोपी जवळून जुगार साहित्य व नगदी रोख असा एकूण ५,२४० रुपये चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन पो. स्टे. अकोट फ़ाइल येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा