- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला पोलिसांनी दिले गृहरक्षक दलाच्या जवानांच्या हाती कोलीत
कोविड योध्दा असलेल्या पत्रकारांवर काठीने हल्ला
अकोला : कोविड 19 च्या काळात पोलिसांसोबत पत्रकार सुध्दा मैदानात उतरून जनसेवा करीत आहेत. त्यामुळे त्यांना कोविड योद्धा समजले जातात. तर पोलिसांचे श्रम जास्त होत असल्याने त्यांच्या मदतीला गृह रक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अकोला पोलिसांनी त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे जवान तैनात करून, त्यांच्या हाती अकोल्यात जनतेच्या सुरक्षेचे जणू कोलीतच दिले आहे.
दिवसभर शहरात रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या गाडीत बसून, चौका चौकात कोणत्याही नागरिकाला मारहाण करतात,असे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. इंग्रजांच्या काळातील पोलीस असावे तसे निर्दोष नागरिकांना काठीने मारत असतात. गृहरक्षक दलाच्या एका जवानाने आज चक्क पत्रकारांनाही काठीने मारहाण केली. या घटनेचा अकोल्यातील पत्रकारांनी निषेध करीत त्या गृहरक्षक जवानांवर आणि त्याला पाठबळ देणाऱ्या ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घटनेचे वृत्त असे की, शहरात स्थानिक पातळीवर बातम्या प्रसारित करणारे एका न्यूज चॅनेलचे संपादक हे बातमी संदर्भात फोनवर बोलत माणिक टॉकीज चौकात उभे असतांनाच, रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठाकरे यांच्या गाडीतून उतरून गृहरक्षक दलाच्या जवानाने कोणतेही कारण नसतांना सरळ लोकांना मारहाण करणे सुरू केले. यावेळी न्यूज चॅनेलचे संपादकांनाही त्या जवानाने काठीने मारहाण केली.
ययाबाबत त्याला पत्रकारांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, ठाणेदार ठाकरे यांनी त्याची बाजू घेत, जणू काही घडलेच नाही, अश्या अविर्भाव आणला. यामुळे त्या गृहरक्षक दलाच्या जवानांसह त्याला पाठीशी घालणाऱ्या ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटना करीत आहेत. या प्रकाराने जनसेवेच्या मदतीसाठी बोलविलेल्या गृहरक्षक दलाच्या हाती अकोला पोलिसांनी दिलेले कोलीत हे पोलिसांसह इतर ठिकाणीही आग लावत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध शहरातील पत्रकारांनी नोंदविला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा