- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विकास कामांवर चर्चा न होता अकोला महापालिकाची सर्वसाधारण सभा आज देखील नेहमी सारखी गोंधळातच आटोपली
The general meeting of Akola Municipal Corporation was held without any discussion on development works
अकोला : अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पुन्हा एकदा वादळी ठरली. अनेक विकासात्मक मुद्द्यांवर ठराव आणि चर्चा करण्यासाठी ही सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, आजची सभा देखील गोंधळातच आटोपली.
मागील सभेत मंजूर करण्यात आलेल्या विषयांची सभेत माहिती देण्याच्या मागणीवरून शिवसेना गटनेते राजेश मिश्रा व सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महापौर विजय अग्रवाल आमने सामने आले. दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर शिवसेनेसह विरोध पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सदस्य महापौरांपुढे एकत्र येत घोषणाबाजी सुरू केली.
या गोंधळात शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी सभेच्या कामकाजाची लेखी नोंद असलेली फाईल मंचावरून उचलून नेली. या गोंधळातच सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला. मात्र, यावेळी देखील गोंधळ सुरूच होता.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा