- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आ. मिटकरी व आयुक्तांची दोन तास चर्चा !
अकोला दि १८:अकोला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी गुरुवारी आमदार अमोल मिटकरी व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली.
यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे विविध पदाधिकारी कृती समितीचे अध्यक्ष पी बी भातकुले यांच्या नेतृत्वाखाली दालनात उपस्थित होते.
चोवीस कोटी रुपये निधीच्या वाटपासाठी सर्वंकष विचार करून कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल असे आयुक्त कापडणीस यांनीं सांगितले आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम व सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाच्या रजा रोखीकरनाची रक्कम तात्काळ देण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे.
महापौर अर्चना ताई मसने व स्थायी समितीचे अध्यक्ष सतिश ढगे यांच्याकडे प्रस्ताव ठेऊन लवकरच हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना आमदार अमोल मिटकरी यांनी आयुक्तांना केली आहे.
रिलायन्स कंपनी कडून चोवीस कोटी रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खर्च करण्यात यावी अशी एकमुखी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती हे विशेष! स्थायी समितीचे सभापती सभापती सतीश ढगे यांनी सुद्धा प्रलंबित मागण्याची पूर्तता करणार असल्याचे या आधी आवर्जून सांगितले आहे .
यावेळी कृती समितीचे पी बी भातकुले , म्युनिसिपल मजदूर युनियन चे अध्यक्ष विठ्ठलराव देवकते, कार्याध्यक्ष धनंजय मिश्रा, विजय पारतवार, संजय काथले, सफाई मजदूर काँग्रेसचे अनुप खरारे, विजय सारवान, कास्ट्राईब संघटनेचे उमेश सटवाले, सुनील पाटील, दिलावर खान, लक्ष्मण गाढवे,भारतीय मजदूर संघाचे प्रकाश घोगलीया, उमेश लखन, भारतीय कामगार सेनेचे दीपक दाणे,कैलाश गाढवे, निलेश सिरसाट,सेवानिवृत्त संघटनेचे जी आर खान,आनंद अवसाळकर,ओम ताडम व सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा