Advocate:अधिवक्ता संघाकडून शिवाणी पोटेचा सत्कार

अधिवक्ता संघाकडून शिवाणी पोटेचा सत्कार 


अकोला: माध्यमिक शालान्त दहावीच्या परिक्षेत शिवानी रविंद्र पोटे हिने नेत्रदीपक यश संपादन केल्याने अकोला अधिवक्ता संघाकडून तिचा सत्कार करण्यात आला.



शिवाणी ही बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी आहे. ती अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील रहीवासी आहे. तिने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र मार्च २०१९-२० या दहावीच्या परिक्षेत ९४ टक्के गुण घेऊन नेत्रदिपक यश मिळविले. तसेच संस्कृत विषयात तिने १०० पैकी १०० गुण घेत उत्तुंग भरारी घेतली. 



शिवाणीचे वडील पेशाने अधिवक्ता असून, अकोला जिल्हा सत्र न्यायालयात वकीली व्यवसाय करतात. अधिवक्त्यांच्या पाल्यांचा उत्साह द्विगुणीत व्हावा आणि त्यांच्या पाल्याची उत्तरोत्तर भविष्यात प्रगती व्हावी, हा दृष्टीकोन ठेवून अकोला अधिवक्ता संघाकडून गेल्या १० वर्षापासुन  गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविल्या जात आहे. 


यावर्षी कोविड-१९ च्या परिस्थितीतही प्रत्यक्ष अधिवक्त्यांच्या घरी जावून त्यांच्या पाल्याचा सत्कार करण्याचा उपक्रम अकोला अधिवक्ता संघ राबवीत आहे, हे विशेष. 



सत्काराच्या प्रतिक्रीया देताना शिवाणीने सांगितले की, मला न्यायिक क्षेत्रात सेवा द्यायची असुन समाजातील उपेक्षित दिनदुबळ्या घटकांची सेवा करायची असुन त्यासाठी मला सर्वस्व पणाला लावायचे आहे. 


हे यश संपादन करतांना छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या माजी मुख्य अध्यापिका माझी आजी स्व. सुमनताई माणिकराव पोटे यांचे वर्ग ७ वी पासुन मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे मी हे शिखर गाठण्यास यशस्वी झाली. मात्र, ही कौतुकाची थाप माझ्या पाठीवर देण्यासाठी व माझा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ती इहलोकात राहली नसुन,ती माझा निकाल येण्याआधीच ११ जुन २०२० रोजी परलोकी गेली, त्याची खंत मला भविष्यात नेहमी सलत राहील.


सत्कार प्रसंगी अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड.एम.एल.शहा, ऍड. सि.जी.कोठारी, ऍड.एस.आर.व्यास, ऍड.पि.डी.देशमुख, शिवाणीचे आईवडिल ऍड.रविंद्र पोटे व वर्षा पोटे व तिचा भाऊ शिवराज पोटे यांची उपस्थिती होती.



टिप्पण्या