- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोल्यात कोरोनाचा प्रकोप: एकाच दिवशी 127 पॉझिटिव्ह
अकोला,दि.5:आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 418 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 291 अहवाल निगेटीव्ह तर 127 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि. 4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 तर खाजगी लॅब मध्ये 16 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4511 (3614+787+110) झाली आहे. आज दिवसभरात 46 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 29551 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 28745, फेरतपासणीचे 184 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 622 नमुने होते. आजपर्यंत एकूण 29441 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 25827 तर पॉझिटीव्ह अहवाल 4511 (3614+787+110) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 127 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 127 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ८१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३१ महिला व ५० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ३८ जण तांदळी येथील, पिंजर येथील १२ जण, भटवाडी बु. येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, केशव नगर येथील तीन जण, गोरक्षण रोड, लहान उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण.
तर उर्वरित मंगरुळ, बाळापूर, मालेगाव बाजार, रेणूकानगर, जूने खेतान, राजपूतपुरा, टिळक वाडी, पंचगव्हाण, अमानखॉ प्लॉट, रवि नगर, भारती प्लॉट, रामनगर व बेलूरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तसेच आज सायंकाळी 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १२ महिला व ३४ पुरुष आहेत. त्यात हातरुण व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी आठ जण, जीएमसी, न्यु राधाकीसन प्लॉट, जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, कौलखेड, सस्ती, पातूर, गोरेगाव खु. येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गौरक्षण रोड, बलोदे लेआऊट, दहातोंडा, सहकार नगर, शिवनी, मुर्तिजापूर, अकोट, संताजी नगर, दिनोडा, संकेतविहार, बाळापूर, जठारपेठ व कटयार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
दोन मयत
दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात कापसी तलाव, ता. पातुर येथील ७३ वर्षीय महिला असून ती २ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला तर मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून तो २ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
46 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २० जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १३ जण, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून सात जण, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण तर हॉटेल रणजित येथून एक जणांना असे एकूण ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
926 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4511(3614+787+110) आहे. त्यातील 165 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3420 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 926 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 97 चाचण्या, चार पॉझिटिव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज दिवसभरात झालेल्या 97 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. बाळापूर येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या.
त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाले नाही, अकोला आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 72 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे दिवसभरात 97 चाचण्यांमध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 13640 चाचण्या झाल्या त्यात 798 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा