Womens wing:'आयएमए, वुमन्स डॉक्टर विंग'नेराबविले विविध उपक्रम!

'आयएमए, वुमन्स डॉक्टर विंग'ने
राबविले विविध उपक्रम!


स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 'वुमन डॉक्टर  विंग' च्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी मोरे यांनी आयएमए अकोला शाखेला ध्यान केंद्र उभारण्यासाठी एक लाख रुपये निधी भेट दिला. डॉ. कल्पना भागवत यांनीही भागवत परिवारातर्फे ५०,००० रूपयांचा निधी या कार्यासाठी भेट दिला.


 
अकोला: अकोल्यातील 'आयएमए'च्या 'वुमन्स डॉक्टर विंग' या संघटनेने 'जागतिक स्तनपान सप्ताह आणि रक्षाबंधन' विविध उपक्रमांनी साजरा केला.

'वुमन्स डॉक्टर विंग'च्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी मोरे आणि सचिव डॉ. निर्मला रांदड यांनी जागतिक स्तनपान सप्ताहा निमित्त जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल आणि डॉ. अर्चना फडके यांच्या मदतीने जिल्हा स्त्री रुग्णालयातील नर्सिंग स्टाफसाठी स्तनपान या विषयावर पोस्टर स्पर्धा घेतली. या स्पर्धेत २४ परिचारिकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पहिला क्रमांक स्विटी शिंदे तर द्वितीय क्रमांक भावना जामनिक आणि तृतीय क्रमांक भावना गवळी यांनी पटकाविले. जज म्हणून डॉ. कल्पना भागवत यांनी सहकार्य केले. स्वातंत्र्यदिनी 'वुमन्स डॉक्टर विंग' च्यावतीने जिल्हा स्त्री रूग्णालयासाठी फेसशिल्डही भेट देण्यात आले.   

 
'रक्षाबंधन' चे औचित्य साधून 'वुमन डॉक्टर  विंग' ने इको फ्रेंडली राखी स्पर्धाही आयोजित केली होती. डॉक्टर महिलांनी स्वतः बनविलेल्या इको फ्रेंडली राख्या स्टुडेंट आर्मी कॅम्प, मणिपूर येथे पाठविण्यात आल्या. यासाठी बीएसएफचे सेवानिवृत्त मेजर सतीश गवई आणि डॉ. मनिषा राठी यांनी मदत केली. राखी स्पर्धेमघ्ये डॉ. मनीषा राठी, डॉ. मंजू शाह, डॉ. ज्योती बक्षी, डॉ. साधना लोटे, डॉ. दीपाली शुक्ला, डॉ. रेखा पाटील, डॉ. ममता अग्रवाल, डॉ. रेखा विरवानी, डॉ. सुवर्ण भोपळे, डॉ. निर्मला रांदड, डॉ. शुभांगी बोराखडे, डॉ. अनुप्रिता चव्हाण, डॉ. प्रेरणा पनपालिया, डॉ. शीतल मुरारका आणि डॉ. सुजाता कोरपे यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी जजचे काम इनरव्हीलच्या सदस्या नयना अमीन यांनी पाहिले. 


गोकुळाष्टमी उत्सवही 'वुमन डॉक्टर विंग'च्या डॉक्टर्स भगिनी तसेच त्यांच्या मुलामुलींनी ऑनलाईन उत्साहात साजरा केला. यामध्ये झुला डेकोरेशनही डॉक्टरांनी स्वतः केले. यामध्ये डॉ. अनिता सोमाणी, डॉ. माधुरी चांडक, डॉ. श्रद्धा अग्रवाल, डॉ. रेखा पाटील , डॉ. मोनिका वायचाळ, डॉ. प्रेरणा पनपालिया, डॉ. शिल्पा चिराणिया, डॉ. किरण गुप्ता, डॉ. शीतल मुरारका, डॉ. राखी मुरारका, डॉ. वंदना बागडी, डॉ. ज्योति बक्षी, डॉ. किरण जेठवानी, डॉ. तपस्या भारती, डॉ. मयूरी महाजन, डॉ. वंदना चांडक, डॉ. सुवर्णा भोपळे, डॉ. मनीषा राठी, डॉ. रचना अग्रवाल, डॉ. स्वरदा धोरण, डॉ. उत्पला मुळावकर, डॉ. नयना तेलकर, डॉ. अर्चना अग्रवाल यांनी सुंदर सजावट करून कृष्णा जन्माष्टमीचा मनमोहक आणि नयनरम्य देखावा बनविला आणि हा उत्सव ऑनलाईन साजरा केला. 

'वुमन डॉक्टर  विंग' ने स्वातंत्र्यदिनही कोरोनासाठीचे सर्व नियम पाळून साजरा केला.  



टिप्पण्या