- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
घरमालकाने घराबाहेर काढुन दिल्याने नाबालिक मुलींसह महिला बेपत्ता
अकोला: सिंधीकॅम्प येथे भाड्याने राहणाऱ्या शारदा उर्फ पद्मा घोडके ही महिला त्यांच्या चार मुलींसह बेपत्ता झाली आहे.
या महिलेचे वय अंदाजे 40 वर्ष असून कु. अंजली गणेश घोडके (मुलगी )वय अंदाजे 11 वर्ष, कु. जया गणेश घोडके( मुलगी ) वय अंदाजे 10 वर्ष कु. कृतिका गणेश घोडके (मुलगी ) वय अंदाजे 7 वर्ष आणि 2 मुले सदर बालके त्यांच्या आई सोबत सिंधी कॅम्प मध्ये राहत होते. आता तेथील घरमालकाने त्यांना घराबाहेर काडून दिले. तेथील नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार ही महिला मुलींना व मुलांना घेऊन शंकर नगर अकोट फैल अकोला येथे सद्यस्थितीत राहत होती.
बाल कल्याण समिती अकोला. यांच्या आदेशाने चाईल्ड लाईन्स 1098 च्या सदस्यांमार्फत महिला व तिच्या मुलांचा शोध घेण्यात येत आहे. अकोटफैल पोलीस स्टेशन अकोला आणि खदान पोलीस स्टेशन अकोला येथे सदर महिला हरवली असल्याची लेखी स्वरुपात तक्रार देण्यात आली आहे.
ही महिला अथवा तिचे मुले कुठे आढळल्यास, या सर्व मुलाचे पुनर्वसन व्हावे, या करिता त्यांना काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालगृहात प्रवेशित करणे गरजेचें आहे. ही महिला व तिचे मुले कुठे दिसल्यास नागरिकांनी चाईल्ड लाईन 1098, अथवा चाईल्ड लाइनच्या समन्वयक हर्षाली गजभिये यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा