VBA:वंचितच्या मागणीला यश,सर्व खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचा कृषी उपसचिवाचा आदेश

वंचितच्या मागणीला यश,सर्व खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचा कृषी उपसचिवाचा आदेश


अकोला: राज्यात तूर मूग उडीद पिकाचे उत्पादन घेणा-या शेतक-याना  झालेल्या नुकसानीची मदत देण्यासाठी पंचनामे करतांना अकोला जिल्ह्यात केवळ मुंग पिकाच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले.अमरावती जिल्ह्यात मात्र मुंगासह उडीद पिकाचेही सर्वेक्षण केले जात होते.अश्या पद्धतीने जाणीवपूर्वक शेतक-यांना नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यात येत होते. कृषी विभागाने मूग उडीद सोबतच पावसाने नुकसान झालेल्या तूर सोयाबीन व इतर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.अन्यथा पक्षाचे वतीने कृषि अधिका-यांना घेराव घालू असा इशारा वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला होता.त्यावर कृषी उपसचिव ह्यांनी खरीप पिकांच्या नुकसानीचा पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याने शेतक-यांचे तूर मूग उडीद सोबत इतर पिकांचे नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात उडीद मुंगाचे पीक चांगले आले होते.परंतु त्यावर विषाणूजन्य रोग पडला आहे.त्यामुळे ही पिके घेणारे शेतकरी उद्ध्वस्त झाले होते.त्यामुळे हजारो हेक्टर मुंग उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला.स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुसार ३३ टक्के पेक्षा नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.कृषी आयुक्तालयाचे आदेशा नुसार अकोला जिल्ह्यात जिल्हा कृषी अधिक्षक मोहन वाघ ह्यांनी केवळ मूग नुकसानीच्या पंचनांम्याचे आदेश काढले होते.



विशेष म्हणजे अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल ह्यांनी मुंग आणि उडीद दोन्हीच्या सर्वेक्षणाचे आदेश काढले आहेत.अमरावती जिल्हा कृषी अधिकारी विजय चवाळे ह्यांनी दोन्ही पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना दिला होता.अमरावती जिल्ह्यात मुंगासह उडीद पिकाचे नुकसानीचा पंचनामा केला जाणार होता.मुंगा सोबतच उडीद पिकावर देखील विषाणूजन्य रोगाचा परिणाम झाला होता.परंतु उडीद तूर पिकाचा समावेश नुकसानीत केलेला नसल्याने वंचितने कृषी कार्यालयांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता.

 
शेतक-यांचे नुकसानीचा विचार करून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार नुकसानग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी कृषी उपसचिवांनी विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते.विभागीय आयुक्त ह्यांनी सर्व जिल्हाधिकारी ह्यांना पत्र देऊन शासन निर्णयात विहित केलेल्या दराने बाधित शेतक-यांचे नुकसानाचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.सबब मूग उडीद तूर सोयाबीन पिकासोबत  नुकसान झालेल्या इतर शेतक-यांचे पिकांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टिप्पण्या