Tiranga Mask:तिरंग्याची प्रतिकृती असलेला मास्क वापरण्यास मनाई

तिरंग्याची प्रतिकृती असलेला मास्क वापरण्यास मनाई


अकोला,दि.१३:  तिरंग्याची प्रतिकृती असलेले मास्क बाजारामध्ये उपलब्ध असल्याचे संदेश समाजमाध्यमावर दिसून येत आहेत. तथापि राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखला जावा यासाठी अशा मास्कचा वापर करण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.  


राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्याचे निर्देश

जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय, अशासकीय कार्यालये, स्वयंसेवा संस्था, प्रतिष्ठाने, स्थानिक प्राधिकरणे, शैक्षणिक संस्था यांना ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदाच्या व प्लॉस्टीकच्या राष्ट्रध्वजांचा वापरावर बंदी आहे. यामुळे असा वापर करणारे नागरिक, विद्यार्थी, उत्पादक, विक्रेते, वितरक व मुद्रक यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरी कोणीही कागदाच्या व प्लॉस्टीकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करु नये व राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

कार्यालये प्रतिष्ठाने व प्राधिकरणे तसेच इतर संस्थांनी ध्वजरोहणाच्या वेळी ध्वज वापराबाबत भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले, जीर्ण व खराब झालेले किंवा माती लागलेले रस्त्यावर, मैदानात पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत.

त्याअनुषंगाने अशा राष्ट्रध्वजाची विल्हेवाट लावण्याकरीता गोळा केलेले राष्ट्रध्वज तालुका पातळीवर, तहसिलदार कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत. अशा राष्ट्रध्वजांची परपस्पर विल्हेवाट लावणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान असुन तसे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

 प्लॉस्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी, नियंत्रण व जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्था महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था व सर्व यंत्रणामार्फत ही बाब विद्यार्थी व नागरिकांच्या निदर्शनास आणुन देण्याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनव्दारे करण्यात येत आहे.


स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात


भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 73 वा वर्धापन दिन  शनिवार दि.15 ऑगस्ट 2020 रोजी साजरा होणार आहे.  शनिवार  दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. 5 मि. वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासशालेय शिक्षणमहिला व बालविकासइतर मागासवर्गसामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गविमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याणकामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते  ध्वजारोहण होणार आहे,  असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  कळविले आहे.



टिप्पण्या