ST Bus:राज्य परिवहन महामंडळाच्या बस उद्यापासून आंतरजिल्हा धावणार!

राज्य परिवहन महामंडळाच्या बस उद्यापासून आंतरजिल्हा धावणार!


अकोला: राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांच्या(एस टी बस) आंतर जिल्हा प्रवासाला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे.

२२ मार्च पासून कोरोना विषाणू प्रतिबंध साठी संपू देशात व महाराष्ट्र राज्यात lockdown करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे रा. प. ची वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर २२ मे पासून जिल्हा अंतर्गत वाहतूक  सुरू करण्यात आली होती.आता उद्या २० ऑगस्ट पासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे.


यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले. मात्र, केवळ एसटी बसच्या माध्यमातूनच आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी देण्यात आलेली आहे. खासगी वाहनांना पूर्वीप्रमाणे ई-पाससह आवश्यक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.

एसटी (लालपरी) गाड्यांनाही आंतरजिल्हा प्रवासाची मुभा दिली असली तरी, प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. आंतरजिल्हा प्रवासाबाबतची मानक प्रणाली एसटी महामंडळ जारी करेल, असे  आदेशात नमुुद  केले आहे. 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा