ShriRam Janmabhumi:अवघी राजराजेश्वर नगरी सजली…जणू अयोध्याच अवतरली...

अवघी राजराजेश्वर नगरी सजली…

जणू अयोध्याच अवतरली...


अकोला: प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन आज बुधवारी होत आहे. कोरोना महामारी मुळे रामभक्तांना अयोध्येत प्रत्यक्षात जाता येणार नाही.त्यामुळे अकोल्यात प्रत्यक्ष जणू काही अयोध्याच अवतरली याची अनुभूती व्हावी, अश्या कार्यक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरांवर विद्युत रोषणाई करून,तोरण पताका बांधून, ध्वज उभारून सजावट केली आहे.  कोरोना लॉकडाउन  मध्ये सुद्धा दिवाळी असल्याचा भास विद्युत रोषणाई पाहून होत होता.दोन दिवसांपासून श्रीराम भक्त या अलौकिक सोहळ्याची तयारी करीत आहे.


मंगळवारी रात्री बुधवारच्या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली होती. जिल्ह्यातील ३०० मंदिरांवर रोषणाई, १० लाख घरांवर दीप प्रज्वलन, चौकाचौकात भगव्या पताकांची आरास अन् रांगोळीच्या माध्यमातून श्रीराम मंदिराचे दर्शन असे सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या पुढाकाराने हा सोहळा आयोजित केला आहे. 



अकोला शहरातील श्रीराजराजेश्वर मंदिर, मोठे राममंदिर, सालासार हनुमान मंदिर, रामदेव बाबा, श्याम बाबा मंदिर, राणीसतीधाम, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, संतोषी माता मंदिर, दुर्गामाता मंदिर, तपे हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर, बिर्ला राममंदिर, छोटे राममंदिर, जुन्या शहरातील राममंदिर, श्रीविठ्ठल मंदिर, डाबकी रोड वरील श्री गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर तसेच माळीपुरा, अकोट फैल, गोरक्षण रोड, हरिहरपेठ, उमरी, जठारपेठ, तापडिया नगर, रामदासपेठ, कौलखेड, खडकी, मलकापूर, आदी भागातील मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली.

कोरोनाचे संकट लक्षात घेता चौकात किंवा रस्त्यावर कुठलाही कार्यक्रम होणार नाही मात्र, जिल्हाभरातील भाविकांनी घरीच राम नाम जप करावा, असे आवाहन श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.




रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने खंडेलवाल भवन येथे सिद्धहस्त रांगोळी कलाकार प्रवीण पवार यांच्या कलाकृतीतून अयोध्या येथील प्रस्तावित राममंदिर व रामलला यांची प्रतिमा साकारली जात आहे. मंगळवारी सायंकाळपासून अनेक युवकांनी,महिला, युवतींनी मंदिरासमोर, मंदिर परिसर आणि मार्गावर पारंपरिक रांगोळ्या रेखाटल्या. संस्कार भारती पद्धतीच्या रांगोळ्या काढून मंगलमय वातावरण निर्मितीत आणखीनच भर टाकली. हजारो दिवे लावण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने पूर्वतयारी केली.


आज ५ ऑगस्ट रोजी पहाटे वेदपाठी ब्राह्मणांच्या पौराहित्यामध्ये मंत्रोपचाराने राम दरबार मूर्ती व श्रीराम जानकी पादुकांचे पूजन होणार आहे.

राम मंदिर निर्माण आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या रामभक्तांचा आनंदाचा हा क्षण आहे त्यामुळे हा आनंद २५ हजार भाविकांपर्यंत लाडू प्रसादाचे वितरण करून द्विगुणीत करणार असल्याची महिती रामनवमी समितीच्या वतीने देण्यात आली.

आमदार गोवर्धन शर्मा ‌.‌ विलास अनासने. अशोक गुप्ता  श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभो  मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ अकोला यांच्या नेतृत्वात जय्यत तयारी  व नियोजन करण्यात आले.




 राम मंदिर भूमिपूजन सोहळा 

  घरी राहून भाविकांनी काय करायचे

श्रावण कृ. २, शके १९४२ (5 ऑगस्ट 2020) रोजी 'अभिजित' मुहूर्तावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन होणार असून हा दिवस आपल्यासाठी अत्यंत भाग्यशाली आणि आनंदाचा आहे. मागील शेकडो वर्षात ज्यांनी श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले, बलिदान दिले त्यांचे आदरपूर्वक स्मरण करण्याचा आहे.


*  5 ऑगस्ट  (बुधवार) रोजी सकाळी आपल्या घरासमोर रांगोळी /रांगोळ्या काढाव्या.


* सकाळी 10:00 वा. प्रत्येक चौकाचौकात (सामाजिक अंतर पाळून) श्रीरामप्रतिमेचे पूजन करावे. पूजन करण्यास येणाऱ्या प्रत्येकाने 'मास्क' लावणे बंधनकारक असावे.


* प्रत्येक घरात *रामरक्षा स्तोत्र* म्हणावे.  शक्य झाल्यास मोठया आवाजात घरात रामभजन लावावे, तसेच घराच्या छतावर भगवा ध्वज लावावा.


*पुरणपोळी, एखादा गोड मेनू  किंवा साखरेचा नैवेद्य श्रीरामाला दाखवावा.


* संध्याकाळी 07:30 ला घरावर, छतावर, अंगणात विद्युत रोषणाई करावी किंवा तेलाचे ५ दिवे लावावे.


*राम रक्षा स्तोत्र मंत्र

"राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।

*सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने॥" चा जाप करावा




*या शिल्पकारांना प्रणाम* 

 

प्रभू श्रीरामाच्या चरित्राचे स्मरण करताच भूमिकन्या सीतेपासून लंकापुरुष बिभीषणापर्यंत असंख्य विभूतींचे स्मरण अपरिहार्यपणे होतेच. विशेषतः बंधू लक्ष्मण, महाबली हनुमान,नल,नील, जांबुवंत, सुग्रीव,जटायू,अंगद अशा अनेक वीरांच्या आठवणी उचंबळून येतात.आता त्याच प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन काही तासांवर येऊन ठेपले असताना अशाच अनेक योद्धया महापुरुषांच्या स्मृती हिंदू समाजाच्या मनात उचंबळून येत असतील. त्यापैकी काही प्रमुख कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करीतच भूमिपूजन सोहळ्याला अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न: 

 

*मोरोपंत पिंगळे* (1919 ते 2003) 

 जबलपूर येथे जन्म. बालवयातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनचे स्वयंसेवक. 1941 पदवीधर झाल्यानंतर संघाचे प्रचारक. संघरचनेतील एक द्रष्टे रणनीतीज्ञ. गोविज्ञान संशोधन, सरस्वती शोध, रामजन्मभूमी मुक्ती यासारख्या,भारतीय संस्कृती जागरणाच्या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा व्यापक आणि वैज्ञानिक मागोवा घेण्याच्या प्रक्रियेचे प्रणेते. *रामजन्मभूमी आंदोलनाचे फिल्डमार्शल* अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.संपूर्ण आयुष्य संघाच्या माध्यमातून समाजसेवेच्या कामी समर्पित. संघाचे दुसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि मोरोपंत या धुरंधर द्वयाने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे पडद्याआड राहून समर्थ नेतृत्व केले.


*महंत श्री रामचंद्र परमहंस दास*  (1913 ते 2003)  

पूर्व बिहार मध्ये जन्म. निर्मोही आखाड्याचे महंत. संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे नाव चंद्रेश्वर तिवारी.1984 मध्ये झालेल्या धर्मसंसदेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष. 1934 पासून मंदिर मुक्तीसाठी प्रखर लढा उभारण्यात अग्रेसर. 1949 मध्ये घुमटाखाली राम लल्ला च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पाठोपाठ रामलल्लाच्या वतीने न्यायालयात दावा दाखल करून जन्मभूमी मुक्तीसाठी अखेरपर्यंत संघर्षरत राहिले.

 

*महंत अवैद्यनाथ

 (1921 ते 2014)

 उत्तर प्रदेशातील कांदी, जिल्हा पौरी गढवाल येथे जन्म. गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे महंत.संन्यास घेण्यापूर्वीचे नाव कृपालसिंह बिष्ट.राजकारणातही दीर्घकाळ सक्रिय.काही काळ हिंदुमहासभेचे अध्यक्ष.हिंदू महासभा,जनता पार्टी आणि नंतर दीर्घकाळ भाजपच्या माध्यमातून पाच वेळा आमदार तसेच 1989, 1991आणि1996 च्या निवडणुकांमध्ये खासदार या नात्याने निवडून आले होते.1984 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीचे संस्थापक प्रमुख.अयोध्या आंदोलनात जीवनभर प्रमुख सहभाग.बिहारमधील सीतामढी ते अयोध्या अशी पहिली यात्रा 1984 मध्ये महंत अवैद्यनाथ यांनी आयोजित केली. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे काका तसेच (गोरक्षपीठाचे) गुरू.

 

*गिरिराज किशोर

(1920 ते 2014)

मिसौली,जिल्हा इटावा उत्तर प्रदेश येथे जन्म,अलिगड येथे शिक्षण. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संपर्कातून संघाचे स्वयंसेवक बनले. 1948च्या बंदी काळात कारावास भोगला. त्यादरम्यान बीए आणि नंतर एमए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. 1949 पासून संघाचे प्रचारक. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक संघटन मंत्री आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष. ओरिसा प्रांत प्रचारक राहिले. मीनाक्षीपुरम येथील धर्मांतराच्या घटनेनंतर अशोक सिंघल यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून परावर्तनाच्या,म्हणजेच घरवापसीच्या अभियानात अग्रेसर. 90% दुरावलेल्या बांधवांनापुन्हा हिंदु धर्मात आणण्यात यशस्वी.कट्टर हिंदुत्वाभिमानी तसेच विज्ञाननिष्ठ कार्यकर्ते म्हणून प्रख्यात. मृत्यूनंतर नेत्रदान आणि देहदानही केले.


*अशोक सिंघल*

 (1926 ते 2015).

वाराणसी येथील आयआयटीतून अभियांत्रिकी पदवीधर झाल्यानंतर 1947 पासून संघाचे प्रचारक. उत्तर प्रदेश सहप्रांत प्रचारक आणि नंतर दिल्ली प्रांत आणि हरियाणा प्रांताचे प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळली. 1980 ते 2011 विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सक्रिय. संयुक्त महासचिव ते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशी वेगवेगळी जबाबदारीची पदे समर्थरीत्या सांभाळली. मीनाक्षीपुरमच्या घटनेनंतर दलितांसाठी खुल्या असलेल्या मंदिरांचे अभियान मोठ्या प्रमाणावर देशभरात चालविले.तमिळनाडूमध्ये दोनशे मंदिरे बांधण्यात पुढाकार.1984 मध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात पुढाकार.एकूणच *राम जन्मभूमी मुख्य आंदोलनाचे शिल्पकार* अशा स्वरूपात प्रख्यात.


या सर्व महनीय कार्यकर्त्यांच्या अतुलनीय आणि त्यागपूर्ण योगदानामुळेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन त्याच्या तार्कीक परिणितीपर्यंत पोचले. आज मंदिरनिर्माणाचा शुभारंभ होत असताना त्या सर्वांविषयी  कृतज्ञता व्यक्त करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या पुण्यपावन स्मृतींना  हृदयपूर्वक विनम्र प्रणाम..!




अयोध्येत राम मूर्ती बनविणारा हा 95 वर्षीय तरुण अवलिया....

अयोध्येतील भगवान राम मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारण्याचे काम आतापर्यंत 1500 पुतळे साकारणारे एक 'राम'च करणार आहेत. या अवलिया शिल्पकाराचे नाव आहे राम सुतार.


95 वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला आहे. धुळे करांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.  


मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर 63 येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.


अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (208 मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. 20 मीटर उंचीचे चक्र 50 मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.


राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची 182 मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 137.2 मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा 212 मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील 16 पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे 50 हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला 16 फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.


1950 मध्ये राम सुतार हे भारतीय पुरातत्त्व विभागासोबत काम करीत होते. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे.


प्रभु श्रीरामचंद्रांचे वकील 


श्री.के.पाराशरण,वय 93 वर्ष,*

जवळपास दिड महिना कोर्टात श्री राम मंदिराची बाजु भक्कमपणे उभे राहून मांडत होते. महत्त्वाचे म्हणजे कोर्टात रामरायाची बाजु मांडताना पायात चप्पल न घालता उभे राहात होते.

.........











टिप्पण्या