national sport day:जय बजरंग विद्यालय कुंभारी येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

जय बजरंग विद्यालय कुंभारी येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा


अकोला: आंतरराष्ट्रीय हॉकीपटू स्व.मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विलास इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा श्रीराम पालकर, प्रा दिलीप अप्तुरकर, प्रा अशोक भराड, प्रा दिलीप चव्हाण, प्रा, प्रफुल्ल देशमुख, प्रा.अपर्णा खुमकर, प्रा.शारदा बावनेर, प्रा.शारदा उमाळे क्रीडा शिक्षक बी.एस.तायडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.


मेजर ध्यानचंद यांची क्रीडा क्षेत्रातील सुवर्णमय कामगिरी व त्यांनी ऑलिम्पिक मध्ये तीन वेळा देशाला मिळवून दिलेले सुवर्णपदक आपल्याला कधीही विसरता येणार नाही असे मत क्रीडा शिक्षक बी.एस.तायडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन देशमुख, नारायणराव धनाग्रे, अतुल घुगे, शुभम खडसे, सुर्यवंशी तायडे, राम कुकडे, प्रेमरत्न सरकटे, निलेश खडसे, सुरज खंडारे, तनवीर खान पठाण इत्यादींनी परिश्रम घेतला



 कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते. 
          

टिप्पण्या

  1. आदरणीय अॅड निलिमा शिंगणे मॅडम तथा भारतीय अलंकार न्युज चॅनलचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार सुध्दा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा