National sport day:जगजेता हिटलरने केलेली ऑफर नाकारणारे देशभक्त मेजर ध्यानचंद Major Dhyanchand, the patriot who rejected the offer made by Hitler

    National Sport Day 2020

जगजेता हिटलरने केलेली ऑफर नाकारणारे देशभक्त मेजर ध्यानचंद

                              F i l e p h o t o

Major Dhyanchand, the patriot who rejected the offer made by Hitler

१९३६ ची ऑलिम्पिक. हॉकी सामन्यात भारताने जर्मनी संघाला  ८-१ ने नमविले. विजयाचे शिल्पकार ध्यानचंद यांच्या खेळाने जगजेता नाझीस्ट Adolf Hitler  एवढा प्रभावित झाला की, स्वतःहुन ध्यानचंद यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली. क्रूरकर्मा म्हणून जगात ओळख असलेल्या हिटलरने मात्र ध्यानचंद यांच्या समोर नतमस्तक होवून विनम्रपणे ऑफर दिली होती. परंतू, स्वाभिमानी आणि देशाभिमान राखणारे ध्यानचंद यांनी क्षणाचाही विलंब न करता बक्कळ पैश्याची आणि मोठ्या पदाची ही ऑफर विनम्रतापूर्ण स्पष्टपणे नाकारली.


                  Fp: A d l o f H i t l e r

भारतीय अलंकार

नीलिमा शिंगणे-जगड

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद  (२९ ऑगस्ट १९०५ ते ३ डिसेंबर १९७९)  यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून जगात ओळखला जायचा. ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि, भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नमविल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती. जी त्यांनी नाकारली. 




ध्यानचंद यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण  पुरस्काराने सन्मान केला. आज त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो.

                       हॉकीचे जादूगर fp

ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. त्यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे इंडियन आर्मीत असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. याच कारणामुळे पहिल्या सहा वर्षांनंतर ध्यानचंद यांचे शिक्षण पूर्ण होवू शकले नाही.



त्यांच्या वडिलांना निवृत्तीनंतर उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये एक जमिनीचा तुकडा मिळाला आणि तेथेच ते स्थायिक झाले. ध्यानचंद यांना मूलसिंग व रूपसिंग हे दोन भाऊ होते. त्यांना लहानपणी कुस्तीची आवड होती, पण आर्मीत दाखल होईपर्यंत हॉकीची त्यांना फारशी माहिती नव्हती. १९२२ मध्ये १६व्या वर्षी ते आर्मीत दाखल झाले. त्या वेळी आर्मीच्या रेजिमेंटमध्ये होणाऱ्या हॉकी सामन्यांत खेळताना त्यांच्या ड्रिबिलगचे कौशल्य मेजर बाले तिवारी यांच्या नजरेत भरले आणि त्यांनी ध्यानचंद यांच्याकडून हॉकीचे तंत्र व कौशल्य घोटवून घेतले.

                    मेजर ध्यानचंद file ph

त्यामुळे १९२२ ते १९२६ या काळात रेजिमेंटच्या तसेच विविध स्पर्धामध्ये त्यांनी आपल्या असामान्य कौशल्याची मोहर उमटवली. या त्यांच्या कर्तृत्वामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडियन आर्मी संघात त्यांची निवड झाली. त्या दौऱ्यात त्यांनी १८ सामने जिंकले, दोन बरोबरीत सुटले व एकमेव लढत त्यांनी गमावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी लढतींत पहिली त्यांनी जिंकली तर दुसऱ्या लढतीत मात्र निसटता पराभव झाला. या दौऱ्यावरून परतताच ध्यानचंद यांना लान्स नाईक बढती मिळाली.


अ‍ॅमस्टरडॅम येथे १९२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये प्रथमच हॉकीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय हॉकी महासंघाने भारतीय संघाची निवड करण्यासाठी इंटरप्रोव्हिन्सेस स्पर्धेचे आयोजन केले होते. यात युनायटेड प्रोव्हिन्सेस, पंजाब, बंगाल, राजपुताना व सेंट्रल प्रोव्हिन्सेस या पाच संघांचा समावेश होता. या स्पर्धेत युनायटेड प्रोव्हिन्सेस संघाकडून खेळण्यासाठी ध्यानचंद यांनी आर्मीची परवानगी मिळविली.




सेंटर फॉर्वर्ड म्हणून खेळणारे ध्यानचंद आणि इनसाईड राईट मार्टिन यांनी अनोखा ताळमेळ दाखवत या स्पर्धेत धमाल उडवली व युनायटेड प्रोव्हिन्सेसने ही स्पर्धा आरामात जिंकली. ध्यानचंद यांच्या कौशल्यपूर्ण खेळाने सर्वानाच भुरळ घातली आणि ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघातील त्यांचा प्रवेश निश्चित झाला.


ऑलिम्पिकसाठी अ‍ॅमस्टरडॅमला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ मुंबईत आला, पण मुंबई विरुद्धच्या सराव सामन्यात त्यांना ३-२ असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचा निरोप समारंभ तसा थंडच झाला.


मात्र, भारताने नंतर इंग्लंडमधील ११ सराव सामने आणि नंतर ऑलिम्पिकसाठी अ‍ॅमस्टरडॅम येथे दाखल झाल्यानंतर सराव सामन्यांमध्ये हॉलंड, बेल्जियम, जर्मनीसारख्या संघांना सराव सामन्यात धूळ चारली होती. पहिल्याच ऑलिम्पिक लढतीत भारताने ऑस्ट्रियाला ६-० असे नमवून तर बेल्जियम, डेन्मार्क, स्वीत्र्झलड या संघांवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.




अंतिम फेरीत यजमान नेदरलँडवर ३-० असा विजय मिळवत ध्यानचंद यांनी भारताला हॉकीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पाच लढतींत त्यांनी तब्बल १४ गोल केल्याने हॉकी विश्वात हॉकीतील जादूगार अशी त्यांची कीर्ती पसरली. जाताना थंडे स्वागत झालेल्या या संघाचे विजयानंतर मात्र मायदेशात जल्लोषात स्वागत झाले. 



१९३२च्या ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघाने अपराजित राहत अंतिम फेरीत अमेरिकेवर २४-१ असा मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.



१९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ बर्लिनला पोहोचला आणि पहिल्याच सराव सामन्यात त्यांना जर्मनीकडून ४-१ असा पराभव सहन करावा लागला. या पराभवाने डिवचलेल्या ध्यानचंद यांच्या संघाने प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र हंगेरी, अमेरिका, जपान, फ्रान्स या संघांविरुद्ध लीलया विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, तेथे यजमान जर्मनी विरुद्धच लढत होणार असल्याने भारतीय संघ थोडा निराश होता. मात्र, अंतिम सामन्याला सुरुवात होताच ध्यानचंद यांच्या जादूई खेळाने यजमानांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही व भारताने ८-१ असा विजय मिळवत ऑलिम्पिक सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. तीन ऑलिम्पिकमधील १२ लढतींत ध्यानचंद यांनी ३३ गोल लगावले.


क्रिकेटमधील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि ध्यानचंद यांची गाठ एकदा पडली. १९३५ मध्ये भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्यांची भेट झाली. त्या वेळी ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना, ध्यानचंद हे क्रिकेटमध्ये धावा कराव्यात त्याप्रमाणे गोल करतात, असे म्हटले होते. एकाअर्थी ते खरेच आहे, कारण आपल्या कारकिर्दीत यांनी एक हजारापेक्षा अधिक गोल केले आहेत.


 १९२८ अ‍ॅमस्टरडॅम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताला सुवर्णपदके मिळवून दिली होती. १९५६मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.



१०० गोल

हॉकी म्हटले की मेजर ध्यानचंद हे नाव सर्वात प्रथम डोळ्यांसमोर येते. त्यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच. हरणा-या ०-२ अशा संघातर्फे खेळत ४ गोल करत संघाला जिंकवणा-या ध्यानचंदला १६ व्या वर्षीच सैन्यात शिपाई म्हणून भरती होण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पातळीवरही अगदी शेवटच्या ४ मिनिटात ३ गोल करत ०-२ च्या पिचाडीवरच्या संघास विजयश्री मिळवून दिल्यामुळे त्यांना भारतीय संघातून खेळण्यासाठी निवडण्यात आले. १९२६ च्या न्यूझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या  भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक  हॉकीत भारत  अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचा हिरो होता ध्यानचंद.


१९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक  स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक  स्पर्धेत अमेरिकेस तर २३ - १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते. हंगेरी विरुद्ध ४-०,  अमेरिका ७-०,  जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकल. हिटलरने  त्यांच्या सैन्यात वरच्या हुद्द्यावर दिलेली नोकरी त्यांनी स्वाभिमानाने आणि देशप्रेमामुळे नाकारली.

  Auther Nilima withAshok kumar

भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा

ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप. ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले.  आज ते हयात नाही पण त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट  हा भारतात  राष्ट्रीय क्रीडा दिन  ( National Sport Day ) म्हणून साजरा होतो. त्यांचे सुपुत्र ओलिम्पियन अशोक कुमार आज हॉकीला संजीवनी देण्यासाठी झटत आहे.मेजर ज्ञानचंद यांना भारत सरकारने भारतरत्न ने सन्मानित करावे, एवढीच  करोडो हॉकीप्रेमींसह अशोक कुमार यांची इच्छा आहे. भारतीय हॉकीचा समृद्ध इतिहास आहे.मात्र,दुर्दैवाने भारतात हॉकी पेक्षा क्रिकेटला अधिक महत्व दिले जाते.सर्वच खेळ चांगले असतात.मग हॉकी,क्रिकेट वा फुटबॉल किंवा खो-खो,कब्बडी.पण सर्व खेळांना भारत सरकारने समान महत्व दिले पाहिजे. नागरिकांनी देखील फेम आणि नेम च्या मागे न लागता कोणता खेळ शरीर आणि मन सुदृढ होण्यासाठी योग्य आहे, याचा विचार करून तो खेळ निवडावा,असे अशोक कुमार यांचे मत आहे.


राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा








टिप्पण्या