National OBC: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 5 वे महाअधिवेशन आज Live महाअधिवेशन सायंकाळी 6 ते 9 दरम्यान

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 5 वे महाअधिवेशन आज Live महाअधिवेशन सायंकाळी 6 ते 9 दरम्यान 



अकोला: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दरवर्षी होणारे महाअधिवेशन यावर्षी 5 वे अधिवेशन Covid - 19 मुळे 7 ऑगष्ट 2020 रोजी सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान Live होणार आहे . 


या अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा . ना . नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार असुन मुख्य अतिथी म्हणुन श्री. तेजस्वी यादव माजी उपमुख्यमंत्री बिहार राज्य व मा. ना. विजय वडेट्टीवार ओबीसी बहुजन कल्यान मंत्री महाराष्ट्र हे राहणार आहेत . तसेच वक्ता म्हणुन श्री. पी. नरहरी IAS आयुक्त व सचिव मध्यप्रदेश व डॉ. आर. एस. प्रविणकुमार IPS सचिव तेलंगाना राज्य हे मार्गदर्शन करणार आहेत. जस्टीस व्ही. एश्वर्या अध्यक्ष उच्च शिक्षण आयोग आंध्रप्रदेश हे विशेष अतिथी म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत . डॉ . हरी एपन्नापल्ली अध्यक्ष लिड इंडिया ( USA ) व डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ उदघाटनीय मार्गदर्शन करणार आहेत . 

या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या खालील समस्या तथा मागण्यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे . 

1 ) ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना.

2 ) आखिल भारतीय स्तरावर होण्याऱ्या पद UG / PG मेडीकल प्रवेशात ओबीसींना आरक्षण . 

3 ) नॉन क्रिमीलीयर च्या बाबतीत बी. पी. शर्मा कमीटीचा अहवाल रद्द करण्याबाबत .
 
4 ) केन्द्रात ओबीसी मंत्रालय सुरू करण्याबाबत . 

5 ) केन्द्र व राज्य सरकारमध्ये असलेली ओबीसी संवर्गाचा रिक्त पदांचा अनशेष त्वरीत भरण्याबाबत . 

6 ) ओबीसींना लादलेली नॉन किमीलीयर ची असंविधानीक अट रद्द करण्याबाबत . 

7 ) न्यायीक संस्थामध्ये तहसील न्यायालयापासुन सर्वोच्च न्यायालयापर्यंत ओबीसी समाजाकरीता जागा आरक्षित करण्याबाबत .


ओबीसी समाजातील ज्या व्यक्तींना या अधिवेशनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी https://forms.gle/TA3o6KsLkDq7KFTL7 या संकेतस्थळावर जावुन आपल्या नावाची नोंद करावी . महाअधिवेशनाचे Live प्रसारण www.facebook.com/manatvusa yupptv.com/channels/tv5-news-int/live youtube.com/c/navtejtvtelugu यावर बघता येणार आहे . तसेच www.AllindiaBCfederation.com या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास ई प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार आहे. 


ओबीसी समाजातील जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करून महाअधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन   डॉ. बबनराव तायवाडे ( राष्ट्रीय अध्यक्ष ) डॉ . खुशालचंद्र बोपचे ( राजकिय समन्वयक ) श्री. सचिन राजुरकर ( महासचिव ), डॉ. अशोक जिवतोडे ( समन्वयक ), डॉ. सुधाकर जाधवर , प्रा . शेषराव येलेकर ( उपाध्यक्ष ) श्री. शरदराव वानखेडे , श्री. खेमेंन्द्र कटरे ( सहसचिव ) श्री. गुणेश्वर आरीकर ( कोषाध्यक्ष ) श्री. मनोज चव्हाण , श्रीमती सुषमा भड , सौ. रेखा बाराहाते , सौ वृंदा ठाकरे ( कार्यकारीणी सदस्य ) श्रीमती कल्पना मानकर ( प्रदेशाध्यक्ष ), श्री. बबनराव फंड , श्री बबनराव वानखेडे , प्रा . संजय पन्नासे ( संघटक ) श्री. रोशन कुंभलकर , निलेश कोडे , मयुर वाघ , विनोद हजारे , कु . सोनिया वैद्य , कु . उज्वला महल्ले , श्री. रूचित वांढरे ( युवा महासंघ )  श्याम लेडे ( कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ) राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदादिकार्यानी  केले आहे. 
                                                                                                    

टिप्पण्या