Nakul Sontakke:नकुल सोनटक्के यांची प्रकृती खालावली...

नकुल सोनटक्के यांची प्रकृती खालावली...


पोलिस स्टेशनचे समजपत्र:चार दिवसानंतरही प्रशासनाकडून दखल नाही, आंदोलन सुरू


दर्यापूर, दि.१७ : मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. चार दिवस त्यांच्या आंदोलनात झाले आहेत. तरीसुद्धा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यांची प्रकृती खालावल्याने पोलीस स्टेशनने त्यांना समजपत्र बजावून उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.


शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालय राहावं. जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नकुल सोनटक्के यांनी १४ ऑगस्टपासून दर्यापुर तालुक्यातील येथील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून भेटी देण्यात आल्या. मात्र तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला पोलीस स्टेशनने समज पत्र पाठवून दिला आहे.

टिप्पण्या