- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
midst of controversy: आमदार म्हणतात, मी क्वारंटाइन मग पक्षांच्या कार्यक्रमाला उपस्थिती कशी?MLAs say, I quarantine then how to attend a party event?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आमदार म्हणतात, मी क्वारंटाइन मग पक्षांच्या कार्यक्रमाला उपस्थिती कशी?
दर्यापुर तालुक्यातील नागरिकांचा सवाल : बळवंत वानखडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
दर्यापुर, दि.२१ : तालुक्यातील समस्या, आंदोलन, उपोषण सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार बळवंत वानखडे यांच्याशी जनता संपर्क साधत आहे. मात्र अशावेळी ते आपण क्वारंटाइन आहोत असे सांगताहेत. नुकताच अमरावती येथील काँग्रेस नगर मार्गावर राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. त्यामुळे आमदार वानखडे हे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्याने आमदारांनी क्वारंटाइनचे चालवलेले ढोंग उघडे पडत असल्याने तालुक्यातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांचे १४ ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली तरीदेखील आमदारांनी सोनटक्के यांच्या उपोषणाला भेट दिली नाही. त्यांची समस्या प्रशासनासमोर मांडली नाही. त्यामुळे आमदार बळवंत वानखडे यांना आंबेडकरवादी संघटनांनी लक्ष केले होते. नागरिकांनी नकुल सोनटक्के यांच्या उपोषणाची माहिती त्यांना दिली होती. त्यावेळी आमदार महोदय आपण क्वारंटाइन असल्याची बतावणी करत होते. त्यानंतर लगेचच अमरावती येथे गुरुवारी पार पडलेल्या एका काँग्रेसच्या कार्यक्रमात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह बळवंत वानखडे हे दिसून येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अन्यत्र कार्यक्रमांना जायला आमदाराला वेळ आहे. मात्र कुणी जर समस्या घेऊन लढत असेल तर त्याच्याकडे हेतूस्पुरस्पर पणे कसा कानाडोळा केला जातो हे आमदार प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत असल्याचे नागरिक बोलत आहे. त्यामुळे पुन्हा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
निष्क्रिय आमदार
"अमरावतीत जायला आमदाराला वेळ आहे. पालकमंत्री यांच्या बाजुला बसायला वेळ आहे. पण जर सामान्य कार्यकर्ता लढत असेल तर त्याला भेट द्यायला वानखडे यांना वेळ नाही. त्यांनी चालविले क्वारंटाइनचे ढोंग उघडे पडले आहे. त्यामुळे जनतेने आता सावध होण्याची वेळ आहे."
-प्रा.विनोद मेश्राम, विदर्भ अध्यक्ष, रिपब्लिकन आंबेडकरवादी पक्ष
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा