KawadYatra2020:जय बाभळेश्वर करणार यंदा दोन भरणे जलाने राजेश्वराला अभिषेक; शिवभक्त पोहचले गांधीग्रामला

जय बाभळेश्वर करणार यंदा दोन भरणे जलाने राजेश्वराला अभिषेक; शिवभक्त पोहचले गांधीग्रामला


जय बाभळेश्वर कावड उत्सव 2020

अकोला: जय बाभळेश्वर शिवभक्त संस्थानच्या वतीने दरवर्षी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णामायच्या जलाने जलाभिषेक करण्यात येतो. यावेळी कावडमध्ये हजारोंच्या संख्येने  जय बाभळेश्वर संस्थांनचे शिवभक्त सामील होतात. 


मात्र, यावर्षी   संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या साथीमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चु कडू, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून तसेच कोरोनाचा प्रसार होणार नाही, या अनुषंगाने शहरातील समस्त कावडधारी शिवभक्तांना आवाहन केले होते.


या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जय बाभळेश्वर शिवभक्त संस्थानच्या वतीने यंदा १०१भरण्याची कावड न आणता केवळ दोन भरण्यातून पूर्णा नदीच्या पवित्र जलाने श्री राजराजेश्वर व बाभळेश्वराला जलाभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

रविवारी सकाळी संस्थानचे सदस्य निखील सहारकर, सतिष भोसले, दिनेश काटे, अभिजीत देशमुख, समीर धोत्रे यांनी पूर्णा नदीच्या पात्रातून दोन कलश भरून जल आणले. या पवित्र जलाद्वारे श्रावण महिन्यातील शेवटच्या म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी सोमवारी जलाभिषेक करण्यात येईल. कावडची परंपरा खंडित न होऊ देता महादेवाच्या चरणी जल अर्पण करणार आहेत. धार्मिक भावना जोपासणाऱ्या शिवभक्तांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या