IPL2020:दर्शन नळकांडे व आदित्य ठाकरे आय.पी.एल स्पर्धेकरिता रवाना

दर्शन नळकांडे व आदित्य ठाकरे आय.पी.एल स्पर्धेकरिता रवाना


भारतीय अलंकार
अकोला: अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे व मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे हे दोन्ही खेळाडू २२ ऑगस्टला बेंगलोर येथून आय.पी.एल स्पर्धेकरिता रवाना होतील.


दर्शन नळकांडेची यावर्षी होणाऱ्या आय.पी.एल. स्पर्धेकरिता(२०२०)सलग दुसऱ्यांदा किंग्स एलेवेन पंजाब संघात निवड झाली असून यावर्षी आय.पी.एल. स्पर्धेत दर्शनला प्लेयिंगइलेवन मध्ये खेळण्याची संधी मिळेल , अशी आशा आहे.

आदित्य ठाकरे याची पहिल्यांदाच आर.सी.बी. संघाकडून नेट बोलर म्हणुन निवड झाली आहे. 

मार्च-एप्रिल मध्ये होणारी स्पर्धा कोरोनामुळे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये दुबई इथे होत असून, या दोन्ही खेळाडूना आपापल्या संघाकडून २२ ऑगस्ट रोजी आबुधाबी करिता प्रस्तान
करतील. 


यापूर्वी दर्शनने वयोगट १५, १६, १९, २३ स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले असून१९ वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया कप करिता मलेशिया येथे १९ वर्षीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर दोन वर्षापासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करित आहे. 

शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे याने यापूर्वी १६, १९, २३ स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व
केले असून १९ वर्षीय भारतीय संघाकडून आशिया कप (मलेशिया) तर न्यूझीलंड येथे झालेल्या १९ वर्षीय world cup
स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच २३ वर्षीय भारतीय संघाचे आशिया कप मध्ये सुध्दा प्रतिनिधित्व केले आहे. तसेच इराणी ट्रॉफी व रणजी ट्रॉफी चे प्रतिनिधित्व करत आहे.

गेल्या ५-६ वर्षात क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नांव राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय
स्तरावर नेले असून हि बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्यातील उदयन्मुख क्रिकेट खेळाडूंकरिता प्रेरणादायी तसेच
आत्मविश्वासात भर टाकणारी असून जिल्यातील उदयम्मुख खेळाडू उरात मोठे स्वप्न घेऊन आत्म्विश्वासाने
मैदानात उतरतील दर्शन व आदित्य ची निवड हि क्लब/जिल्हया करीता अभिमास्पद असल्याची माहिती अकोला
क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.


खेळाडूंच्या निवडी बद्दल त्यांचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडीटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ऍड. मुन्ना खान,गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माझी कर्णधार विवेक बिजवे, क्रीदापारीषद सदस्य जावेदअली,
परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, एस.टी. देशपांडे, किशोर धाबेकर तसेच अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोलाच्या खेळाडूंनी त्यांचे कौतूक केले.

टिप्पण्या