Ganesh festival2020:८४ वर्षाची परंपरा: मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक उपक्रमाना प्रारंभ

                 श्रीगणेश दर्शन

८४ वर्षाची परंपरा: मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक उपक्रमाना प्रारंभ


भारतीय अलंकार
अकोला: गत ८४ वर्षापासून स्थानीय सावतराम चाळ परिसरात स्थापित श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमास प्रारंभ होत आहे. करोना संकटात शासकीय निर्देशाचे पालन करीत या वर्षी मंडळाच्या वतीने चार फूट गणेश प्रतिमा साकार केली असून रिद्धी सिद्धी असणारी भव्य झाकी साकारण्यात आली आहे.



आज दिनांक २२ आगस्ट पासून या उपक्रमास प्रारंभ होत असून सकाळी ८ ते १० व दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत जुना कापड बाजार येथील बियाणी चौक परिसरात आयुष्य काढा नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे .तसेच दरदिवशी जिल्हा स्त्री रुग्णलयात ४०० भोजन डबे महिला रुग्णांना देण्यात येणार असून सूर्योदय, उत्कर्ष बालगृह, गायत्री बालिकाश्रम, कर्णबधिर कन्याशाळा आदींना भोजनाचे डब्बे वितरीत करण्यात येणार आहे. 



या गणेशोत्सवात ऑनलाईन भजन, कीर्तन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून समाज माध्यमावर हा ऑनलाइन हा कीर्तन सोहळा प्रसारित करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करीत नागरिकांसाठी ऑक्सीमीटर, तापमान मापक यंत्र आदींची व्यवस्था पेंडल मध्ये करण्यात आली आहे. 


या दहा दिवशीय महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती उपाध्यक्ष नितीन चांडक, सचिव अमित राठी, सहसचिव आशिष राठी, कोषाध्यक्ष प्रशांत चांडक, शरद चांडक, अशोक भूतडा,ब्रजेश तापडिया, शैलेश तिवारी,सचिन चांडक, पंकज तापडिया, भूपेंद्र तिवारी, विश्वनाथ शर्मा, मनोज बोदडे, सुशांत राठी,गोविंद लड्डा, अश्विन जाजू, केशव खटोड, मनोज लड्डा, लुनकरण मालानी, नरेंद्र भाला, पराग शहा, अमित भुतडा,आलोक भुतडा, सत्यम अग्रवाल, संजय मंत्री, अजय सारडा, प्रतिक भुतडा, पलक तिवारी, हिमांशू मानधने, अदैत तापडिया,संकेत चांडक, सुजल गौरव चांडक, विलास मोरे, प्रभू मोरे, सुहास पाटील, विठ्ठल महल्ले,राम बानाईत, अक्षय मोरे, अनंत बोधडे, राधेश्याम चांडक, विजय राठी, प्रमोद कचोलिया, विजय राठी जावरा, निशांत भंसाली, कमलकिशोर तापडिया, जगमोहन तापडिया, मनमोहन तापडिया, अनिल तापडिया, सुनील बंग, गोपाल लाहोटी, राजेश खेडकर, आयुष शर्मा, लोकेश टावरी, भरत तापडिया, योगेश कलंत्री, विजय मानधने, नीरज तापडिया, उदय शाह, दिवेश शाह, अतुल मांडणी, शैलेश शहा, मुन्ना दुबे, नारायण दुबे, राजू तायडे,राकेश दुबे आदी प्रयत्न करीत आहेत.

Subscribe, Share & Comment

टिप्पण्या