- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मेजर ध्यानचंद जन्मदिनी क्रीडा दिन
Fit India अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ उत्साहात साजरा
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यमानाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिन व फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रम वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला हारपुष्प अर्पन करुन, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, दिनकर उजळे, चारुदत्त नाकट क्रीडा अधिकारी व सतिषचंद्र भट बॉक्सींग क्रीडा मार्गदर्शक, लक्षमीशंकर यादव राज्य क्रीडा मार्गदर्शक कुस्ती, हॉकी अकोला असोसिएशनचे सचिव धिरज चव्हाण, प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, निशांत वानखडे, गजानन चाटसे, अजिंक्य धेवडे, अशोक वाठोरे, गंगाधर झरे, अनिल डेंगाळे
हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कुस्ती, बॉक्सोंग या खेळाचे माहिती पत्रकचे विमोचन गणेश कुळकर्णी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सर्व सामान्य नागरिक, खेळाडू यांच्या करीता कोविड १९ कोरोना विषाणू या पार्श्वभुमीवर ऑक्सीमिटर पाताळणी करण्यात आली. दुपारी ०१ ते ०२ या वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे राज्यस्तरीय वेबीनार व्याख्यानचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यान अंतर्गत मानसशास्त्र तज्ञ डॉ. दिपक केळकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मानसशास्त्र व्दारे क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्याचे मार्ग या विषयावर आपले विचार व्यक्त केले. सदर वेबीनार निशुल्क ठेवण्यात आले होते. या राज्यस्तरीय वेबीनार मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तसेच हॉकी अकोला असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अभय पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सायंकाळच्या सत्रामध्ये फोन इन
कार्यक्रम अंतर्गत खेळामध्ये करीअर या विषयावर दिनकर उजळे, क्रीडा अधिकारी, सतिष भट राज्य क्रीडा मार्गदर्शक
बॉक्सींग व लक्षमीशंकर यादव राज्य क्रीडा मार्गदर्शक कुस्ती यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन दिनकर उजळे क्रीडा अधिकारी यांनी व आभार प्रदर्शन सतिष भट राज्य क्रीडा मार्गदर्शक बॉक्सींग यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा