Electricity bill:शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून अकोट येथे वीज बिलाची होळी

शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती  कडून अकोट येथे वीज बिलाची होळी



अकोट: शेतीला मिळत असलेल्या उणे सबसिडी च्या पाश्वभूमीवर ' कर्ज नही देगे बिजली का बिल भी नही देगे', या घोषणेचा अनुषंगाने आज नऊ अगस्ट क्रांती दिनी अकोट महावितरण कंपनी समोर वीज बिलाची होळी करण्यात आली. 



आंदोलकांच्या म्हणण्यानुसार कोरोना संक्रमण काळात केंद्र सरकारने लॉक डाऊनची कठोर अंमलबजावणी केली. कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. पण जनतेला त्याचा आर्थिक भुदंड खूप बसला. त्यातही मध्यम वर्ग व गरिबांना रोजगार उपलब्ध न झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यावर कहर म्हणून महावितरणने लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे बिल एकत्र पाठवले. जे काही हजारो रुपयात आहे ते  संपूर्ण माफ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. 


यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित पाटील बाहाळे,शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख (माहिती व तंत्रज्ञान आघाडी) लक्ष्मीकांत कौठकर, दिनेश देऊळकार, गजानन मोहोकार,मोहन खिरोडकार, दिनेश गिर्हे,जाफर खा,राहुल घोडेस्वार, मकसूद मुल्ला,आकाश देऊळकार उपस्थित होते.



Please Share, subscribe, Comment

टिप्पण्या