Electricity bill:मेटाकुटीला आलेल्या वीज ग्राहकांना राज्यसरकार वीज बिल कधी माफ करणार ?

मेटाकुटीला आलेल्या वीज ग्राहकांना राज्यसरकार वीज बिल कधी माफ करणार ? 


सरकारची कुंभकर्णी  झोप उडविण्यासाठी पुन्हा एकदा  आम आदमी पक्ष  तीव्र आंदोलन करणार 



अमरावती विभागीय संयोजक शेख अन्सार  यांची अकोल्यात पत्रकार परिषदेत  माहिती 



अकोला : अव्वाच्या सव्वा वीजबिलांमुळे मेटाकुटीला आलेल्या वीज ग्राहकांना राज्य
सरकारकडून  मोठा दिलासा देण्याची  अपेक्षा आहे.  वीज वापरानुसार वीज  ग्राहकांना वीजबिलात सवलत द्यावी  दिल्लीतील  केजरीवाल सरकारने 200  युनिट वीजचा वापर करणाऱ्या ग्राहकांना बिलात पूर्णपणे माफी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य मध्ये वीज माफी द्यावी  अशी मागणी आम आदमी पक्षाने महाराष्ट्र भर लावून धरली आहे.मात्र, राज्यातील जनतेच्या हिताची  भाषा करणारे महाविकास आघाडी सरकारने अजून यावर निर्णय घेतला नाही. 



लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या कर्माचाऱ्यांना घरोघरी जाऊन वीज मीटर रीडिंग घेता आलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपन्यांकडून वीज ग्राहकांना जी वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ती अवाच्या सवा आली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये मोठ्या असंतोषाचे वातावरण आहे. या संदर्भात आम आदमी पक्षाने  कोरोना काळातही राज्यभर आंदोलने केली आहेत.नागरिकांना आलेल्या अवास्तव वीजबिलांकडे आंदोलनं करून सरकारचे 
लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे . मात्र  जनतेबाबत उदासीन असलेल्या या सावकारी सरकारने अजूनही वीज ग्राहकांना दिलासा दिला नाही. 

त्यातच याच मागणीसाठी सत्तेत असलेल्या पक्षाने आंदोलन करणे सुरू केले आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर पुन्हा एकदा कुंभकर्णी  झोपेचे नाटक करीत असलेल्या  सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन सुरू करू अशी माहिती आज आम आदमी पक्षाचे अमरावती विभागीय संयोजक तथा राज्य कमिटी सदस्य  शेख अन्सार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.   



यावेळी अकोला जिल्हा प्रभारी संयोजक  अरविंद कांबळे,महानगर संयोजक प्रा. खंडेराव दाभाडे पाटील ,महानगर सह संयोजक संदीप जोशी ,महानगर सचिव गजानन गणवीर सह आम आदमी पक्षाचे  कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या