- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खते खरेदीसाठी वापरा डिजीटल पेमेंट पद्धती
अकोला,दि.२८: खतांचे विक्री व्यवहार सुरळीतपणे व्हावेत यासाठी जिल्ह्यातील खत विक्रेते तसेच शेतकरी बांधवांनी खते खरेदी विक्री करतांना डिजीटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषि विकास अधिकारी , जिल्हा परिषद अकोला यांनी केले आहे.
पिकांसाठी खतांची खरेदी करतांना शेतकऱ्यांकडून कॅशलेस, डीजीटल पेमेंट प्रणालीचा अवलंब करण्यात यावा असे निर्देश केंद्रीय रसायन व खते मंत्रालय तसेच कृषि आयुक्तालय, पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. खत विक्री संदर्भातथेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडून पॉस (POS) द्वारे अनुदानित खताची विक्री करणे सोईचे झाले आहे. त्यामुळे खतांचा पुरवठा हंगामानुसार सुनियोजित पद्धतीने करण्यात येत आहे. खतांची विक्री व्यवहार सुरळीतपणे सुरु रहावी यासाठी राज्यातील सर्व खत विक्रेत्यांकडे खते विक्रीसाठी कॅशलेस, डिजीटल पेमेंट प्रणाली लागू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील खत विक्रेते तसेच शेतकरी बांधवांनी खते खरेदी विक्री करतांना डिजीटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषि विकास अधिकारी , जिल्हा परिषद अकोला यांनी केले आहे.
कृषि मंत्री दादा भुसे यांचा जिल्हा दौरा
अकोला,दि.२८: राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे शनिवार दि.२९ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.२९ रोजी सकाळी साडेअकरा वा. कृषि विषयक जिल्हा आढावा बैठक, स्थळः नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. बैठकीनंतर क्षेत्रिय भेटी व बुलडाण्याकडे प्रयाण करतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा