Corona virus:PDKV अकोला येथील कोरोना रुग्णांना उत्तम भोजन

PDKV अकोला येथील कोरोना रुग्णांना उत्तम भोजन



कराओके गीतगायनातून रुग्णांचे चांगले मनोरंजन


प्लाझ्मा दान करणार- भारती वानखडे


अकोला: आज अकोला शहरातच नव्हे तर सगळीकडेच कोरोनापाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने  वाढत आहे. परंतु त्याहीपेक्षा समाजात कोरोनाविषयीचे अज्ञान आणि कोरोनाची भीती वाढत असताना दिसत आहे. हे अज्ञान आणि भीती दूर करण्यासाठी कोरोना रूग्ण असलेल्या सौ. भारती वानखडे यांनी पाऊल उचलले आहे.



भारती वानखडे ह्या गृहीणी असून त्यांचे पती संघदास वानखडे हे जि. प. शाळेवर शिक्षक आहेत. भारती वानखडे यांचे जेठ पाॅझिटिव्ह निघाले. तेव्हा भारती वानखडे यांनी क्वारंटाईन होण्यास स्वतः पुढाकार घेतला. रॅपिड टेस्टमध्ये त्या, त्यांचे पती पाॅझिटिव्ह निघाले. तर पंचाहत्तर वर्षीय सासूबाई ह्या निगेटिव्ह निघाल्या. आता भारती वानखडे ह्या PDKV अकोला येथे उपचार घेत आहे. 


येथे व्यवस्था एकदम उत्तम आहे. टाॅयलेट, वाॅशरूम एकदम स्वच्छ आहेत. सर्वच डाॅक्टर्स चांगली सेवा देत आहेत. सकाळसंध्याकाळ आनंदाने तपासणी करतात. भोजनव्यवस्था चांगली आहे. सकाळी चहा, नाश्ता, सकाळचे जेवण, चार वाजता चहा-दूध, संध्याकाळचे जेवण इ. सर्वकाही स्वादीष्ट मिळत आहे. एकंदरीत रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे कराओकेगीत गायन कोरोनारुग्णांच्या मनोरंजनासाठी ठेवले आहे. किशोर कुमार, मो. रफ़ी, मुकेश, महेंद्र कपूर, शैलेंद्र, कुमार सानू यांची सुमधूर गाणी ऐकायला मिळतात. तसेच रुग्णांची फ़र्माईशसुद्धा पूर्ण केली जाते. त्यामुळे रुग्णांच्या आनंदात आणखी भर पडत आहे. त्यांचा मानसिक थकवा दूर होत आहे. झिंग झिंग झिंगाट, शांताबाई या गाण्यावर रुग्ण आनंदाने डान्स करत आहेत.



 कोव्हिडशी यशस्वा लढा दिल्यावर, यशस्वी चाचणी झाल्यावर भारती वानखडे व त्यांचे पती संघदास वानखडे हे स्वतः पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करणार आहेत.
म्हणून ताप, सर्दी, ओला-कोरडा खोकला, मन अस्वस्ध होणे, थकवा जाणवणे, दम लागणे इ. लक्षणे असल्यास किंवा कोव्हिडशी संबंधित इतरही लक्षणे आढळल्यास कोण काय म्हणेल याची भीती न बाळगता, न घाबरता आनंदाने कोव्हिड चाचणी करून घेण्याची भारती वानखडे यांनी विनंती केली आहे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा