Corona virus update:Akola:कोरोना अलर्ट:आज 30 पॉझिटिव्ह!

Akola:कोरोना अलर्ट:आज 30 पॉझिटिव्ह!




*आज मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १३८*
*पॉझिटीव्ह- ३०*
*निगेटीव्ह- १०८* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १६ महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील रवी नगर व मोठी उमरी येथील पाच जण, जोगळेकर प्लॉट, नवीन भिम नगर व  पुनोती येथील तीन जण, वाडेगाव व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित शिवर, सीएस ऑफीस, जूने शहर, अकोट, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगा नगर, बायपास, जूने शहर अकोला येथील ५१ वर्षीय पुरुष असून तो दि. ९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६०७+४९०=३०९७*
*मयत-११७, डिस्चार्ज- २४२५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५५५*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*



पर्जन्यमान

काटेपूर्णा प्रकल्प
आज दि. 11/08/2020 रोजी सकाळी 10:00 वाजता काटेपूर्णा प्रकल्पामध्ये  85.54% जल साठा उपलब्ध आहे.रात्री काटेपूर्णा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे जलाशयात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.येणाऱ्या पाण्याची आवक पाहून नदीमध्ये पाणी सोडण्यात येईल.  पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 


काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


टिप्पण्या