Corona virus treatment:कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी झोन निहाय स्वॅब संकलन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी झोन निहाय स्वॅब संकलन

अकोला,दि.११: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  जिल्ह्यात विशेष मोहिमेव्दारे अधिकाधिक स्वॅब घेवून कोरोना तपासणीची गती वाढवा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोरोनाच्या संदर्भांत आढावा घेताना, ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, नोडल अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, संदिप गावंडे, गजानन मुर्तळकर यासह वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते.


जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहे. कोरोनाचा रुग्ण उशीरा रुग्णालयात पोहचत असल्यामुळे त्यांची स्थिती गंभीर होवून त्याचा मृत्यू होण्याचा धोका संभावत आहे. हे सर्व टाळण्यासाठी विशेष मोहिम राबवून झोन निहाय अधिकाधिक स्वॅब संकलन करुन  कोरोना चाचण्याची गती वाढवावी. यामुळे वेळीच उपचार होवून मृत्यूचे प्रमाण आटोक्यात येवू शकते, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी विशेष करुन किराणा दुकान, भाजी विक्रेते, सलून आदी ठिकाणी संसर्ग फैलाव होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी दुकानदारांनी स्वंयस्फुर्तीने कोरोना चाचण्या करुन घ्याव्यात, असे  आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून कोरोना फैलाव रोखण्यासाठी त्याच्याही चाचण्या त्वरीत कराव्या, असेही निर्देश त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले.



34 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 232 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 198 अहवाल निगेटीव्ह तर  34 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3101(2611+490) झाली आहे. आज दिवसभरात 19 रुग्ण बरे झाले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 540 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 22355 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 21747, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  439  नमुने होते. आजपर्यंत एकूण 22291 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 19680  आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3101(2611+490) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 34 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी  30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 16 महिला व 14 पुरुष आहेत. त्यातील रवी नगर व मोठी उमरी येथील पाच जणजोगळेकर प्लॉटनवीन भिम नगर व  पुनोती येथील तीन जणवाडेगाव व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित शिवरसीएस ऑफीसजूने शहरअकोटगंगा नगरजीएमसी हॉस्टेल व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तसेच आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहे. त्यातील सस्ती ता. पातुर येथील तीन जण तर बाजोरिया नगरी येथील एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.


19 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांनाकोविड केअर सेंटर येथून चार जणउपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार जणओझोन हॉस्पीटल येथून तीन जण तर ऑयकॉन हॉस्पीटल येथून पाच जणांना अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगा नगरबायपासजूने शहर अकोला येथील 51 वर्षीय पुरुष असून तो दि. 9 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

 

540 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3101(2611+490) आहे. त्यातील  117 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2444 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 540 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 209 चाचण्यामध्ये  केवळ सात जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण,  पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाला नाही. अकोटयेथे 77 चाचण्या झाल्या त्यात तीन पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणीही पाझिटिव्ह आले नाही. 
बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात दोन पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 21 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही तसेच  अकोला मनपा येथे 56 चाचण्या झाल्या त्यात दोन  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह  आले, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 45 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  अशा प्रकारे दिवसभरात 209 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 9977 चाचण्या झाल्या असून 503 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.




टिप्पण्या