Corona virus treatment:अकोल्यात आतापर्यंत 3290 कोरोनाग्रस्त; आज आणखी एकाचा मृत्यू

अकोल्यात आतापर्यंत 3290 कोरोनाग्रस्त; आज आणखी एकाचा मृत्यू

                               F i l e p h o t o

मुंबई, नंदूरबार, सोलापूर, अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी या जिल्ह्यांचा मृत्यूदर हा राज्य सरासरीपेक्षा अधिक


अकोला,दि.१८:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 215 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 184 अहवाल निगेटीव्ह तर  31 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3290(2758+532) झाली आहे. आज दिवसभरात 64 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 24172 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23520, फेरतपासणीचे 173 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  479  नमुने होते. आजपर्यंत एकूण 24049 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21291 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3290(2758+532)  आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज 31 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील रिधोरा बाळापूर येथील सहा जण, दहिगाव गावंडे येथील चार जण, गड्डम प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व रायखेड ता. तेल्हारा  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात  सहा महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील सहा जण, रिधोरा बाळापूर येथील तीन जण तर उर्वरित मोठी उमरी, मळसूर, जूने शहर, रामदास पेठ, शास्त्री नगर व जठारपेठ चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.


एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सिद्धार्थनगर, जूने शहर येथील 74 वर्षीय पुरुष असून तो दि. 13 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


64 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांना, कोविड केअर सेंटर येथून ३१ जण, ओझोन हॉस्पीटल येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून आठ, कोविड केअर सेंटर अकोट येथून सात जणांना अशा एकूण ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


394 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3290(2758+532)  आहे. त्यातील  137 जण मयत आहेत. स्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2759 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 394 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



Rapid Test

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 145 चाचण्यामध्ये  23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण,  बाळापूर, व पातूर येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 36 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 22 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 15 चाचण्या झाल्या त्यात तीघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे 35 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी  33 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे चाचण्या झाल्या नाही, अशा प्रकारे दिवसभरात 145 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 10728 चाचण्या झाल्या असून 560 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.



मुंबई, नंदूरबार, सोलापूर, अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी या जिल्ह्यांचा मृत्यूदर हा राज्य सरासरीपेक्षा अधिक


कोरोनाबाधितांच्या निकटसहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबई येथे सांगितले.


यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री  टोपे म्हणाले की, कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या निकट सहवासातील व्यक्तींचा शोध तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. यासाठी जे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रमाणापेक्षा कमी कॉन्टॅक्ट ट्रेसींग झाले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या आढावा बैठकीत या सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा राज्याचा दर हा ३.३५ टक्के असून मुंबई, नंदूरबार, सोलापूर, अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी या जिल्ह्यांचा मृत्यूदर हा राज्य सरासरीपेक्षा अधिक असल्याने या जिल्ह्यांना मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन जिल्ह्यांना विशेषज्ञ घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अशा विशेषज्ञांना तीन महिन्यांची ऑर्डर दिली जाते आणि २ लाख रुपये प्रति महिना अदा केले जातात. विशेषज्ञ उपलब्ध होण्यासाठी मानधनात वाढ करतानाच तीन ऐवजी सहा महिन्यांची ऑर्डर देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या प्राधान्याने वर्ग क आणि ड च्या मेरीट नुसार याद्या करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अ आणि ब संवर्गाची पदे भरण्यासाठी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यवाही लवकरच पूर्ण करेल असेही श्री. टोपे यांनी सांगितले.


राज्यात जे रुग्ण बरे होत आहेत त्यातील काही जणांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवत असून त्यातील काहींना पुन्हा दाखल करावं लागत आहे. हा अनुभव नवा असून टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे त्यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना ५० लाख रुपयांचे विमा छत्र लागू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात आयएमएच्या पदाधिकाऱ्यां समवेत गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. त्यांच्या मागणीनुसार केंद्र शासनाच्या विमा योजनेंतर्गत खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनाकाळात काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आरोग्य संचालकांची अनुमती त्यासाठी आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


देशात कोरोनाची स्थिती


देशात काल ५८ हजार कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन  घरी गेले असून केवळ एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या लवकरच 20 लाखावर पोचेल.


देशात आतापर्यंत 19 लाख 77 हजार 779 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, रुग्ण बरे होण्याचा दर 73 पूर्णांक 18 शतांश टक्क्यावर पोचला आहे, तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट होत असून त्याचा दर 1 पूर्णांक 92 शतांश टक्के इतका आहे. 


आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाच्या 30 हजार नव्या रुग्णांची नोंद  झाली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या  27 लाख 2 हजार 743 वर पोहोचली आहे. सध्या सहा लाख 73 हजार 166 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 876 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं देशात आतापर्यंत कोरोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या  51 हजार 797 वर पोहोचल्याचं आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे .


राज्यातील स्थिती


राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. आज ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.


आज निदान झालेले ११,११९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९३१ (४९), ठाणे- १३१ (४), ठाणे मनपा-१६४ (१८), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१२ (१०), उल्हासनगर मनपा-८ (५), भिवंडी निजामपूर मनपा-९ (२), मीरा भाईंदर मनपा-१५१ (२), पालघर-१०९, वसई-विरार मनपा-१५५ (३), रायगड-२५५ (२५), पनवेल मनपा-१६७ (३६), नाशिक-१५६ (११), नाशिक मनपा-५११ (५), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-२२० (७),अहमदनगर मनपा-३१५ (१०), धुळे-६० (२), धुळे मनपा-३६ (२), जळगाव-३९९ (१०), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-३७ (३), पुणे- ४१८ (१६), पुणे मनपा-१२६७ (५४), पिंपरी चिंचवड मनपा-७४७ (१९), सोलापूर-३२८ (११), सोलापूर मनपा-१०८ (२), सातारा-३५३ (११), कोल्हापूर-३३४ (११), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-१५४ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (६), सिंधुदूर्ग-४१ (१), रत्नागिरी-१४० (३), औरंगाबाद-११५,औरंगाबाद मनपा-१३१, जालना-६३, हिंगोली-१९ (२), परभणी-४४ (१), परभणी मनपा-५४, लातूर-८१ (३), लातूर मनपा-१०१ (१), उस्मानाबाद-१०२ (४), बीड-११६ (६), नांदेड-१०६ (२), नांदेड मनपा-१५१, अकोला-२ (२), अकोला मनपा-८ (१), अमरावती-५१ (१), अमरावती मनपा-८२ (३), यवतमाळ-७३, बुलढाणा-१०१ (१), वाशिम-२४, नागपूर-१५६ (७), नागपूर मनपा-६५६ (२७), वर्धा-१४, भंडारा-५५, गोंदिया-२४, चंद्रपूर-९ (१), चंद्रपूर मनपा-७ (१), गडचिरोली-११, इतर राज्य ७ (२).


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.





टिप्पण्या