Corona virus treatment:आणखी 19 नवे रुग्ण;आतापर्यंत 2698 कोरोनाग्रस्त

आणखी 19 नवे रुग्ण;आतापर्यंत 2698 कोरोनाग्रस्त

अकोला,दि.3:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 63 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 44 अहवाल निगेटीव्ह तर  19 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2698(2332+366) झाली आहे. आज दिवसभरात 63 रुग्ण बरे झाले. आता 377 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20417 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19834, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  416  नमुने होते. आजपर्यंत एकूण 20286  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 17954   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2698(2332+366)आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज 19 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  सात महिला व 12 पुरुष आहेत. त्यात रेणुका नगर, अकोला येथील चार जण, बाबुळगाव अकोला  येथील तीन जण तर उर्वरित कापसीउमरीसिव्हिल लाईनघोडेगाव तेल्हारासहकार नगरसुवर्णा नगरपी एस मुख्यालय,  मूर्तिजापूरलोहारा बाळापूरडाबकी रोडखदान व जवाहर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


63 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 44 जणांनाकोविड केअर सेंटर अकोला येथून 14 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून एक जणांना, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून दोन जणांना अशा एकूण 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
दोन मयत
दरम्यान दोघांचे मृत्यू झाले. त्यात 70 वर्षीय पुरुष असून ते दाळंबी अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. दोन ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच 51 वर्षीय पुरुष असून ते लोहाराबाळापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. एक ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला
377 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2698(2332+366) आहे. त्यातील  जण 112 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2209 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 377 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 43 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह


टिप्पण्या