Corona virus news:कोरोनाचा कहर सुरूच...अकोल्यात आतापर्यंत ३९४२ कोरोनाग्रस्त

कोरोनाचा कहर सुरूच...अकोल्यात आतापर्यंत ३९४२ कोरोनाग्रस्त


अकोला,दि.३०:आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८८ अहवाल निगेटीव्ह तर  ६५ अहवाल पॉझिटीव्ह आले. 


त्याच प्रमाणे काल (दि.२९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २८ तर खाजगी लॅब मध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३९४२ (३१५६+७१६+७०)  झाली आहे. आज दिवसभरात २५ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २७४९२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २६७८५, फेरतपासणीचे १७६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५३१ नमुने होते. आजपर्यंत एकूण २७३१७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २४१६१ तर पॉझिटीव्ह अहवाल  ३९४२ (३१५६+७१६+७०) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज ६५ पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात ६५ जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ६५  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात २६ महिला व ३९ पुरुष आहेत. त्यातील मोऱ्हाड ता. बार्शीटाकळी येथील १६ जण, सस्ती ता.पातूर येथील नऊ जण, मूर्तिजापूर येथील आठ जण, गोरक्षण रोड येथील पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, पंचशील नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित वाडेगाव, राधाकिसन प्लॉट, आलेगाव ता. पातूर, कृषी नगर, निंबधे प्लॉट, पळसो बधे, सोनारी ता. मूर्तिजापूर, पिंजर,जुने खेतान नगर, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, सोंदाळा ता.  तेल्हारा व बटवाडी ता. बाळापूर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 

तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये २८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या चाचण्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, अकोला यांच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

२५ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६ जणांना,कोविड केअर सेंटर येथून १४ जण, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर  येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण तर ओझोन हॉस्पीटल येथून दोन जण, अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
६२२ रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ३९४२ (३१५६+७१६+७०) आहे. त्यातील  १५१ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  ३१६९  संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



         रॅपिड ॲन्टीजन टेस्ट 

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १३४ चाचण्या झाल्या त्यात  नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर बार्शीटाकळी येथे दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोला मनपा येथे ९६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर ३१ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात १३४ चाचण्यांमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत १२५७१ चाचण्या झाल्या त्यात ७३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम

राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३  हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.



बुलडाणा जिल्हा स्थिती

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 343 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 255 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 88 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 व रॅपिड टेस्टमधील 33 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 124 तर रॅपिड टेस्टमधील 131 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 255 अहवाल निगेटीव्ह आहेत. 


पॉझीटीव्ह आलेले अहवाल 

बुलडाणा शहर: 2, इथापे ले आऊट 1, सुंदरखेड 1,  चिखली तालुका : शेळगाव आतोळ 2, अंत्री खेडेकर 1, भालगाव 2, बुलडाणा तालुका : 1, सोयगाव 1, धाड 1, चिखली शहर: 18, शेगाव शहर: मटकरी गल्ली 1, पोलीस मुख्यालय 2, नागझरी रोड 1, शिवाजीनगर 1, दे. राजा तालुका: जवळखेड 1, बायगाव 2, मेंडगाव 4, नांदुरा तालुका: नायगाव 1, जळगाव जामोद तालुका: पिंपळगाव काळे 1, सिंदखेड राजा तालुका : शेंदुर्जन 2, दुसरबीड 1, देऊळगाव कोळ 1, वाघाळा 1, सिंदखेड राजा शहर : 13, मलकापूर शहर 2, गांधी चौक 1, दे. राजा शहर : खडकपुरा 2, मेहकर शहर: 1, लोणार शहर: 3, मेहकर तालुका : बरटाळा 1, संग्रामपुर तालुका: वानखेड 1, सोनाळा 1, मोताळा तालुका : धामणगाव बढे 1, जळगाव जामोद शहर: 1, खामगाव शहर: 1, आठवडी बाजार 1, नांदुरा रोड 1, विठ्ठल नगर 2, चांदमारी 1, घाटपुरी नाका 2, समता कॉलनी 1, सिंधी कॉलनी 2, चांदे कॉलनी 1 संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे.  अशाप्रकारे जिल्ह्यात 88  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे  उपचारा दरम्यान जागदरी ता. बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरुष,  जांभोरा ता. चिखली 65 वर्षीय महिला  रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 


तसेच आज 18 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे:  दे.राजा: 3, बुलडाणा: 7, जळगाव जामोद: 1, लोणार: 1, खामगाव : 4, नांदुरा : 2

तसेच आजपर्यंत 17545 रिपोर्ट  निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2124 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2124 आहे.


आज रोजी 915 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 17545 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3071 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2124 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 899 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


टिप्पण्या