Corona virus news:कोरोनाचा चढता आलेख;अकोल्यात एकूण ३४६८ कोरोनाग्रस्त: देशात ३० लाखाच्यावर रुग्ण

कोरोनाचा चढता आलेख;अकोल्यात एकूण ३४६८ कोरोनाग्रस्त: देशात ३० लाखाच्यावर रुग्ण


एकूण कोविड रूग्णांची संख्या आता ३० लाख ४४ हजार ९४० इतकी झाली आहे २२ लाख ८० हजाराहून  अधिक लोक कोविडमुक्त झाले आहेत, कालपर्यंत देशात ३ कोटी, ५२ लाख, ९२ हजार २२० चाचण्या झाल्या असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे.




अकोला,दि.२३:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३९७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३७० अहवाल निगेटीव्ह तर  २७ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३४६८(२८९०+५७८) झाली आहे. आज दिवसभरात ६३ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २५७२२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५०४७, फेरतपासणीचे १७४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण २५५८५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  २२७९५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३४६८(२८९०+५७८) आहेत.


आज दिवसभरात २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी २६  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर  येथील नऊ जण, चागेफळ व पाथर्डी ता. तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, बेलखेड व अकोट येथील प्रतेकी दोन जण,   तर उर्वरित  जय हिंद चौक, खदान, म्हैसपुर,  राजराजेस्वर नगर, शिवसेना वसाहत, तळेगाव ता. तेल्हारा व तेल्हारा येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण पुरुष असून नायगाव, अकोला येथील  रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.


एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण कोकणवाडी, मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून तो दि. १८ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


६३ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११ जणांना, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून पाच जणांना तर कोविड केअर सेंटर बाळापूर येथून सहा जणांना, अशा एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.



३२०पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3468(2890+578) आहे. त्यातील  144 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3004 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 320 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 141 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, अकोट, बार्शीटाकळी, पातूर, मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे 107 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी  30 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे एकाची चाचण्या झाली त्यात कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशा प्रकारे दिवसभरात 141 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 11402 चाचण्या झाल्या असून 590  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.


राज्यातील स्थिती

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १० हजार ४४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ७१  हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.


आज निदान झालेले १०,४४१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २५८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९९१ (३४), ठाणे- १५० (१), ठाणे मनपा-१४३ (४), नवी मुंबई मनपा-३४८ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१५, उल्हासनगर मनपा-१३ (७), भिवंडी निजामपूर मनपा-१५ मीरा भाईंदर मनपा-११२ (३), पालघर-२११ (२), वसई-विरार मनपा-१३७ (१), रायगड-१९७ (२), पनवेल मनपा-१३८, नाशिक-२२६ (३), नाशिक मनपा-१२२ (७), मालेगाव मनपा-३८ (२), अहमदनगर-२६६ (९),अहमदनगर मनपा-२३१ (३), धुळे-२०, धुळे मनपा-३४ (४), जळगाव-४८७ (२), जळगाव मनपा-१४० (२), नंदूरबार-११९, पुणे- ५६९ (११), पुणे मनपा-१२८८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-६७९ (१६), सोलापूर-२७६ (५), सोलापूर मनपा-४० (१), सातारा-२५३ (७), कोल्हापूर-३४३ (१२), कोल्हापूर मनपा-१७९ (१), सांगली-१५० (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७५ (५), सिंधुदूर्ग-० (१), रत्नागिरी-३६ (२), औरंगाबाद-३६ (३),औरंगाबाद मनपा-३४ (४), जालना-९० (३), हिंगोली-६४, परभणी-३२, परभणी मनपा-५४ (१), लातूर-१०५ (५), लातूर मनपा-४१ (१), उस्मानाबाद-१८३ (४),बीड-८१ (५), नांदेड-४९ (१), नांदेड मनपा-१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-६, अमरावती-३३, अमरावती मनपा-३६ (१), यवतमाळ-५९ (२), बुलढाणा-६१, वाशिम-३३, नागपूर-१३८, नागपूर मनपा-६८० (२२), वर्धा-१६, भंडारा-१४ (१), गोंदिया-२२, चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-३५, गडचिरोली-१४, इतर राज्य १६.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.




देशातील स्थिती

देशात कोविड रूग्णांच्या संख्येनं ३० लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या चोविस तासांत, देशात ६९ हजार २३९ नवीन रूग्ण सापडले. देशात गेल्या चोवीस तासांत ९१२ जण कोविडनं मृत्युमुखी पडले असून, एकूण बळींची संख्या ५६ हजार ७०६ इतकी झाली आहे.


एकूण कोविड रूग्णांची संख्या आता ३० लाख ४४ हजार ९४० इतकी झाली आहे २२ लाख ८० हजाराहून  अधिक लोक कोविडमुक्त झाले आहेत, कालपर्यंत देशात ३ कोटी, ५२ लाख, ९२ हजार २२० चाचण्या झाल्या असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटले आहे.


देशात कोरोना विषाणुच्या संसर्गासाठी कालपर्यंत तीन कोटी ५२ लाख ९२ हजार २२० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात काल आठ लाख एक हजार १४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात सध्या सात लाख सात हजार ६६८ रुग्णांवर या संसर्गासाठी उपचार सुरू असून एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २३ पूर्णांक २४ शतांश टक्के आहे.



New update
वाढीव देयक: रुग्णालयांकडून होणार दंड वसूल

कोरोना विषाणूच्या रुग्णांना वाढीव देयकं आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून त्यांनी आकारलेल्या वाढीव रकमेच्या किमान ५ पट दंड वसूल करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्यशासनानं हा निर्णय घेतला आहे.



टिप्पण्या