f मुख्य सामग्रीवर वगळा

Corona virus news:आज अकोल्यात सात नवे कोरोनाग्रस्त; एका रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू

39 अहवाल प्राप्त; 7 पॉझिटीव्ह, 34 डिस्चार्ज, 1मयत




अकोला,दि. 4:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 39 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 32 अहवाल निगेटीव्ह तर  सात अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2708(2339+369) झाली आहे. आज दिवसभरात 34 रुग्ण बरे झाले. आता 352 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20433 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19850, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  416  नमुने होते. आजपर्यंत एकूण 20325 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 17986   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2708(2339+369)आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज सात पॉझिटिव्ह
आज दिवसभरात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित जूने शहर, वाडेगाव, कौलखेड, न्यू राधाकिसन प्लॉट व डाबकी रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



34 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 26 जणांनाकोविड केअर सेंटर अकोला येथून दोन जणांना, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून तीन जणांना अशा एकूण 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


एक मयत
दरम्यान एकाचा मृत्यू झाला. त्यात 50 वर्षीय पुरुष असून ते मुर्तिजापूर  येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 31 जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


352 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2708(2339+369) आहे. त्यातील  जण 113 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2234 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 352 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 424 चाचण्या, 47 पॉझिटिव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 424 चाचण्यामध्ये 47 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाहीत.  अकोट येथे 38 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, बाळापूर येथे 241 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला


बार्शीटाकळी येथे  पाच चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे 36 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  तसेच अकोला मनपामध्ये 86 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 18 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचण्या झाल्या नाही, असे एकूण 424 चाचण्या होऊन त्यात 47 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. 



आतापर्यंत जिल्ह्यात 8272 चाचण्या झाल्या असून 422 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


टिप्पण्या